२९ वर्षांनंतर देवेंद्र फडणवीसाना अक्कल दाढ आली का? विनायक राऊत यांचा घणाघात

मुंबई – मुंबईत महाराष्ट्र दिनानिमित्त सोमय्या मैदानावर (Somaiya Maidan) जाहीर सभा घेऊन भाजपाने ( BJP ) शक्तिप्रदर्शन ( Demonstration of strength )केले. या सभेत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Leader of Opposition Devendra Fadnavis) यांचे मुख्य भाषण झाले. या भाषणाची सध्या बरीच चर्चा होताना दिसून येत आहे. या वेळी बाबरी मशीद ( Babri Masjid ) पाडली तेव्हा एकही शिवसैनिक उपस्थित नव्हता असं ते म्हणाले.

फडणविसांनी केलेली टीका सेनेला झोंबली असून आता शिवसेना खासदार विनायक राऊत ( Shiv Sena MP Vinayak Raut ) यांनी जोरदार हल्ला चढविला आहे. २९ वर्षांनंतर देवेंद्र फडणवीसाना अक्कल दाढ ( Akkal Dadh) आली का? असा प्रश्न खासदार विनायक राऊत यांनी उपस्थित केला. अख्या देशाला माहिती आहे, ज्यावेळी बाबरी मशीद पाडली गेली तेव्हा भाजपचे सर्व वरीष्ठ नेते शेपटी घालून पळत होते. ढसाढसा रडत होते. त्यावेळी बाळासाहेबांनी बाबरी मशीद पाडणाऱ्याना आधार दिला. मुख्यमंत्री होत नाही म्हणून देवेंद्रचा सध्या स्मृतीभश झाला. त्यामुळे ते अशी वक्तव्य करत आहेत.असा टोला देखील त्यांनी लगावला.

लोकसभेमध्ये अटल बिहारी वाजपेयी ( Atal Bihari Vajpayee ) हे रडले आणि अडवाणीनी जे वक्तव्य केले. ज्यांनी बाबरी मशीद पाडली तेव्हा भाजपचे कोणी नव्हते, हे एकदा त्यांनी तपासून पहावे. त्यावेळी भाजपचे नेते कोणत्या बिळात लपले होते आणि आमचा शिवसैनिक ( Shiv Sainik ) कोणत्या बुरुजावर चढला होते हे मीडियाने त्यावेळी दाखवलं होत असे विनायक राऊत यांनी सांगितले.