अदानी नावाच्या आपल्या जुन्या मित्रावर शरद पवार काही बोलले का हो? वागळेंचा खोचक सवाल 

 Nikhil Wagale : हिंडेनबर्ग रिसर्चच्या अहवालानंतर अदाणी समूहाचे सर्वेसर्वा गौतम अदाणी चांगलेच अडचणीत आल्याचे चित्र आहे.विरोधक देखील या मुद्द्यावर चांगलेच आक्रमक झाले असून रस्त्यावर आंदोलन करण्यापासून ते संसदेपर्यंत आवाज बुलंद केला जात आहे. अब्जावधी रुपयांचा महाघोटाळा झाला असताना मोदी सरकार अदानीच्या चौकशीला का घाबरत आहे? असा सवाल कॉंग्रेस सह अनेक विरोधक उपस्थित करत आहेत.

दरम्यान, एका बाजूला हे सर्व सुरु असताना जेष्ठ नेते शरद पवार यांच्या मौनावर जेष्ठ पत्रकार निखील वागळे यांनी भाष्य केले आहे. अदानी नावाच्या आपल्या जुन्या मित्रावर शरद पवार काही बोलले का हो?असा खोचक सवाल उपस्थित करत वागळे यांनी थेट मर्मावर घाव घातला आहे. आता पवार यावर आपली भूमिका कधी आणि कशी मांडणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.