देवेंद्र फडणवीसांनी घोषणा केलेला प्रकल्पही जुनाच, राष्ट्रवादीच्या नेत्याने केला भांडाफोड

पुणे : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील प्रकल्प आणि त्यावरून होणारे राजकारण यामुळे राज्यातील राजकीय वातवरण ऐन थंडीत तापलेले दिसत आहे. यातच आता रांजणगाव इलेक्ट्रॉनिक क्लस्टर प्रोजेक्ट बाबत माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walase Patil) यांनी मोठा खुलासा केला आहे. हा प्रकल्प जुनाच आहे. केंद्र आणि राज्य सरकार जनतेची दिशाभूल करत आहे, असा आरोपच पाटील यांनी केला आहे.

राज्यात एकापाठोपाठ प्रकल्प महाराष्ट्राबाहेर गेल्यामुळे सरकारची मोठी नाचक्की झाली आहे. त्यामुळे पुणे जिल्ह्यातील रांजणगाव इलेक्ट्रॉनिक क्लस्टर प्रोजेक्टची घोषणा करण्यात आली आहे. पण माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी याबद्दल मोठा खुलासा केला आहे. ‘प्रकल्प जुनाच असून केंद्र आणि राज्य सरकार दिशाभूल करत आहे. अशाच पद्धतीने महाराष्ट्राची फसवणूक करण्याचं काम हे सरकार करत आहे’ असा घणाघात पाटील यांनी केला.