Dipex 2025 | अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, सृजन ट्रस्ट, कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग, महाराष्ट्र शासन, सी. ओ. इ. पी. टेक्नोलॉजिकल यूनिवर्सिटी व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आयोजित डिपेक्स 2025 ही ३४वी आवृत्ती, पुणे येथे COEP तंत्रज्ञान विद्यापीठ, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने ३ ते ६ एप्रिल २०२५ या कालावधीत हे प्रदर्शन सुरू आहे.आज या प्रदर्शनाच्या तिसऱ्या दिवशी राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी भेट दिली. या प्रदर्शनाविषयी आपले मत व्यक्त करताना “विद्यार्थ्यांनच्या मनात उद्योजगता निर्माण करण्याचे काम अभाविप करत आहे त्या बद्दल शासन म्हणून आम्ही आभारी आहोत अशी भावना व्यक्त केली. डिपेक्स २०२५ मधील प्रदर्शनांनी प्रभावित होऊन उद्योगमंत्री सामंत यांनी सप्टेंबर महिन्यात राज्यात होणाऱ्या डिफेन्स एक्स्पो साठी आमंत्रित केले तसेच डिपेक्स ची पुढची आवृत्ती रत्नागिरी जिल्ह्यात व्हावे अशी इच्छा व्यक्त केली.
तसेच माजी केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी ही या प्रदर्शनाला सदिच्छा भेट दिली. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू प्रा. डॉ.लक्ष्मीकांत दामा यांनीही भेट दिली.यावेळी कार्यक्रमाच्या उत्कृष्ट नियोजनाबद्दल आयोजकांचे आणि विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
डिपेक्स ( Dipex 2025) या भव्य प्रदर्शनाच्या कार्यक्रमाला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट दिली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की “2047 पर्यंत विकसित भारताच उद्दिष्ट ठेवलेल आहे.त्या उद्दिष्टाकडे आपण चाललो आहोत. कौशल्य विकास व उद्योजकता आणि नाविन्यता या विभागातून मोठ्या प्रमाणात उद्योजक तयार करणे , कोणतीही आयडिया जर स्टार्टअप मध्ये रूपांतरित होत असेल तर त्याला कमर्शियल करण्याकरता 100 कोटीचा फंड तयार केलेला आहे. डिपेक्स मध्ये सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांनी आपलं एक नवीन स्टार्टअप मॉडेल तयार करा, त्यातील उनिवा भरून काढून, यशस्वी उद्योजकाशी त्यांना काय हवंय चर्चा करा आणि कमर्शियल मॉडेल कसे तयार करू शकतो अशा प्रकारचा प्रयत्न करा . या प्रयत्नांना हातभार लावण्याकरता महाराष्ट्र सरकार आणि देशाचे सरकार हे निश्चितपणे तुमच्या पाठीशी उभे राहील. डिपेक्स च्या माध्यमातून जी सेवा चालली आहे आणि त्याचे हे बदलते स्वरूपामध्ये आपल्याला आज अतिशय यंग आणि ब्राईट अशा प्रकारचे इनोव्हेटिव्ह माईंड या ठिकाणी पाहायला मिळतात.” तसेच राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे व सुजन ट्रस्टचे विशेष आभार व्यक्त केले.
यावेळी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा, अभाविप राष्ट्रीय महामंत्री वीरेंद्र सिंग सोलंकी, प्रमोद चौधरी, अर्जुन वाडकर, भरत अमळकर, प्रमोद कुलकर्णी, स्वागत समिती अध्यक्ष प्रकाश धोका, स्वागत समिती सचिवप्रसेंजित फडणवीस, स्वागत समिती निमंत्रक संकल्प फळदेसाई आणि अभाविप प्रदेश मंत्री अथर्व कुलकर्णी उपस्थित होते.
आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअॅप ग्रुप
महत्वाच्या बातम्या :
दीनानाथ मंगेशकर रुग्णालय प्रकरणाची देवेंद्र फडणवीस यांनी घेतली गंभीर दखल, चौकशी समिती स्थापन
तुम्ही “गोधडी ओली करत होतात” तेव्हा भाजप आणि देवेंद्रजी राम मंदिरासाठी कारसेवा करत होते
दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या विरोधातील आंदोलन भोवलं; भाजपा महिला कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल