दृश्यम -3 येणार का ? दिग्दर्शक जीतू जोसेफ म्हणाले…

दिल्ली : दृश्यम ही भारतीय चित्रपट उद्योगातील सर्वात यशस्वी चित्रपटांपैकी एक आहे. आत्तापर्यंत या चित्रपटाचे दोन भाग प्रदर्शित झाले आणि ते दोन्ही भाग यशस्वी ठरले. हे दोन भाग इतर भाषांमध्येही प्रकाशित झाले आहे.

दृश्यम 2 च्या यशानंतर, चाहत्यांनी दिग्दर्शक जीतू जोसेफने तिसरा भाग देखील आणावा अशी इच्छा व्यक्त केली होती. यावर दिग्दर्शक म्हणाले की, तिसरा भाग बनवण्याची फक्त 50-50 शक्यता आहेत. ते बनवण्यासाठी दोन ते तीन वर्षे लागतील, असे त्यांनी सांगितले.

जीतू जोसेफ म्हणाले, “मी त्यावर काम करत आहे (भाग 3) माझ्याकडे एक क्लायमॅक्स आहे आणि मी मोहनलाल सरांशी चर्चाही केली होती आणि ते खूप उत्साहित होते पण त्या क्लायमॅक्सपर्यंत पोहोचण्यासाठी मला खूप सीन्सची गरज आहे. तर, हे माझे आव्हानात्मक क्षेत्र आहे आणि मी त्यावर काम करत आहे. जर मला चांगल्या कल्पना मिळाल्या तर मी त्यावर काम करेन.”

सध्या, जीतू त्याच्या आगामी 12th Man चित्रपटाच्या पोस्ट-प्रॉडक्शन कामात व्यस्त आहे, ज्यामध्ये मोहनलाल देखील मुख्य भूमिकेत आहे. त्यांच्या जोडीला हा चौथा चित्रपट आहे. त्यांचा तिसरा चित्रपट, राम सध्या होल्डवर ठेवण्यात आला आहे. त्याचे बहुतांश शूट यूके आणि अरब देशांमध्ये केले जाणार आहे. आता इतर देशांमध्ये प्रवासी निर्बंध असल्याने, परिस्थिती स्थिर झाल्यावर निर्माते त्याचे शूटिंग करण्याचा विचार करत आहेत.