अजब कारभार : सरनाईकांच्या इमारतीचा दंड माफ करण्याचा प्रस्ताव मांडला जाण्याची चर्चा

मुंबई – शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या ठाण्यातील छाबय्या विहंग गार्डन इमारतीचा दंड माफ करण्याचा प्रस्ताव आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत येणार आहे. तर, यावेळी महापालिकेला भोगवटा प्रमाणपत्र देण्याचा आदेशही दिला जाणार असल्याची चर्चा आहे.

राज्य मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत मांडल्या जाणाऱ्या शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या ठाण्यातील इमारतीचा दंड माफ करण्याच्या प्रस्तावाची चर्चा सध्या सुरू आहे.   प्रताप सरनाईक यांच्या ठाण्यातील छाबय्या विहंग गार्डन इमारतीचा दंड माफ करण्याचा प्रस्ताव आज मंत्रिमंडळ बैठकीत मांडण्यात येणार असल्याची चर्चा आहे.एबीपी माझा या वृत्तवाहिनीने याबाबत वृत्त दिले आहे.

विशेष म्हणजे केवळ दंड माफ करण्याचा प्रस्ताव नाही, तर या इमारतीला भोगवटा प्रमाणपत्र देण्याचा आदेशही मंत्रिमंडळ बैठकीतून महापालिकेला देण्यात येणार असल्याचं कळतंय. तसं झालं तर एका आमदारासाठी मंत्रिमंडळात, असा निर्णय घेण्याची कदाचित ही पहिलीच वेळ असेल. दरम्यान, या पार्श्वभूमीवर आता प्रताप सरनाईक यांच्यावर राज्य सरकार मेहरबान झालंय का? असा सवाल सध्या उपस्थित केला जात आहे.