गोव्याला मधुचंद्रासाठी गेलेल्या पती-पत्नीमध्ये वाद (Husband-wife dispute) झाल्याने पत्नीने पती रमेशला तिथेच सोडून घरी परत येत पोलिसात तक्रार दाखल केली. उत्तर प्रदेशातील महाराजगंज येथे १२ फेब्रुवारीला त्यांचे लग्न झाले होते.
पत्नीने दिलेल्या (Husband-wife dispute) तक्रारीनुसार, १९ फेब्रुवारीला ते मधुचंद्रासाठी गोव्याला गेले. मात्र, २२ फेब्रुवारीला वाद झाल्यानंतर पतीने मारहाण करून ठार मारण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे ती घरी परतली आणि रमेशसह सात जणांविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली.
पोलिसांनी हुंडा छळ आणि मारहाणीच्या आरोपांखाली रमेशसह सात जणांवर गुन्हा दाखल केला आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षक सोमेंद्र मीना यांनी दिली. पुढील तपास सुरू आहे.
आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअॅप ग्रुप
महत्वाच्या बातम्या :
मनसे नेत्यांना शिवसेनेत आणण्याचा प्रयत्न? राज ठाकरे संतापले!
शरद पवारांचं राजकारणातलं स्टेटस मोदींपेक्षा मोठं, पंतप्रधानांच्या त्या कृतीनंतर राऊतांची प्रतिक्रिया
आमदार रवींद्र धंगेकर शिवसेनेत जाणार? भगव्या स्टेटसने राजकीय चर्चांना उधाण