पक्षांतर्गत नाराजी झाली दूर…. कांचन गडकरींच्या औक्षणानंतर  बावनकुळेंचा उमेदवारी अर्ज    

नागपूर : महाराष्ट्र विधान परिषदेच्या नागपूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघातून भारतीय जनता पक्षाने उमेदवार जाहीर केला आहे. नागपूर MLCच्या जागेसाठी माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना भाजपने उमेदवारी दिली आहे. महत्वाचे म्हणजे या घडामोडीमुळे पक्षाची बावनकुळेंविषयी असलेली नाराजी दूर झाल्याचेही बोलले जात आहे.

आज सकाळी चंद्रशेखर बावनकुळे यांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. यावेळी विधानसभेचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस, महापौर दयाशंकर तिवारी, सुलेखा कुंभारे प्रामुख्याने उपस्थित होते. विधानपरिषदेच्या जागेसाठी उमेदवारी दाखल करण्यापूर्वी कांचन गडकरी यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांचे औक्षण केले.

नागपुरात विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने शक्तिप्रदर्शन करीत चंद्रशेखर बावनकुळे यांनी उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी आर. विमला यांच्या कडे दाखल केला. भाजपा नेते आणि बालपणीपासून संघाचे स्वयंसेवक नगरसेवक छोटू भोयर यांनी सोमवारी भाजपा सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश केला. काँग्रेसच्या शहर कार्यालयात हा कार्यक्रम पार पडला. छोटू भोयर मंगळवारी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी चंद्रशेखर बावनकुळे यांच्या विरोधात नामांकन अर्ज भरणार असल्याचे सांगितल्या जात आहे. कधीकाळी भाजपचेत कार्यकर्ते राहिलेले छोटू भोयर आता भाजपच्याच माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा विरोधात लढणार असल्याने विधानपरिषदेच्या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष राहणार आहे.

https://youtu.be/FkhUTw1OjTM

You May Also Like