औरंगाबाद : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या शासन निर्णयानुसार सर्व ऊसतोड कामगार यांची नोंदणी करुन त्यांना ओळखपत्र देण्याचा निर्णय घेतलेला आहे. जेणेकरुन शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांचा लाभ त्यांना देता येईल.
ऊसतोड कामगार ज्या ठिकाणी वास्तव्याला आहेत, जे सतत मागील तीन वर्षे ऊसतोड कामगार म्हणून काम करत असतील त्यांना संबंधित ग्रामसेवकाने ओळखपत्र द्यावे. जिल्ह्यातील ऊसतोड कामगार यांनी संबंधित ग्रामसेवक यांच्याकडे नोंदणी करुन ओळखपत्र प्राप्त करुन घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी केले आहे.
ऊसतोड कामगारांना ओळखपत्र देणे, त्याचबरोबर स्थानिक पातळीवर निर्माण होणाऱ्या समस्येचे तातडीने निराकरण करण्यासंदर्भात जिल्हास्तरीय समितीची जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालय, औरंगाबाद येथे बैठक पार पडली.
https://youtu.be/FkhUTw1OjTM