सरंजामी प्रवृत्ती जोपासणा-या नाना पटोलेंसंदर्भात (Nana Patole) एक बातमी आज दिवस चर्चेत राहिली. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचे चिखलात माखलेले पाय त्यांनी एका काँग्रेस कार्यकर्त्याला धुवायला लावले. अकोल्यातून चीड आणि संताप आणणारी दृश्यं आज दिवसभर चर्चेत राहिली. ज्यात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) गाडीत बसलेत आणि काँग्रेसचा कार्यकर्ता चक्क त्यांचे चिखलात माखलेले पाय धुतोय.
अकोल्याच्या वाडेगावात मुक्कामी असलेल्या संत गजानन महाराजांच्या पालखीचं दर्शन नाना पटोलेंनी घेतलं. मात्र इथं पावसामुळं प्रचंड चिखल झाला होता. चिखलातून वाट काढत नानांनी दर्शन घेतलं.. त्यानंतर एका काँग्रेस कार्यकर्त्याकडून स्वतःचे चिखलानं माखलेले पाय धुवून घेतलं… पटोलेंच्या या सरंजामी वृत्तीवर त्यांच्या विरोधकांनी सडकून टीकेची झोड उठवलीय.
याच मुद्द्यावरून भाजप नेते विक्रांत पाटील यांनी टीका केली आहे. ते म्हणाले, इतरांना हिन लेखून त्यांना गुलामाप्रमाणे वागवण्याची काँग्रेसची नेहमीचीच मानसिकता पुन्हा एकदा समोर आली आहे.स्वतः चे पाय ओबीसी समाजाच्या आमच्या बांधावकडून धुवून घेणारे काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले स्वतः ला काय कोणते महाराज,संत,महंत समजतात काय? हा प्रश्न आज जनतेच्या मनात आहे.काँग्रेसच्या आणि नाना पटोलेंच्या अश्या सरंजामशाही मानसिकतेच्या विरोधात भाजपा युवा आणि महिला मोर्चा आज राज्यभर उग्र आंदोलन करणार आहेत अशी घोषणा देखील त्यांनी केली आहे.
आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअॅप ग्रुप
महत्वाच्या बातम्या :