पक्षाच्या चिन्हाबाबत कोणताही निर्णय घेऊ नका, सुप्रीम कोर्टाची सूचना, सोमवारी होणार पुढील सुनावणी

नवी दिल्ली –  राज्यात उद्धव ठाकरे आणि शिंदे गट आमने-सामने असून सुप्रीम कोर्टाकडून आजही निर्णय येऊ न शकल्याने सत्तासंघर्ष कायम राहणार आहे. राज्याच्या सत्तासंघर्षावर सध्या सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली आहे. मात्र अद्यापही कोणताच निर्णय होऊ शकलेला नाही. बंडखोर आमदारांना अपात्र ठरवण्यात यावे, तसेच विधानसभेच्या अध्यक्षपदाची निवडणूक, राज्यपालांनी एकनाथ शिंदे आणि भाजपला दिलेली सत्ता स्थापनेची परवानगी, नव्या सरकारने सिद्ध केलेले बहुमत अशा विविध प्रकरणात शिवसेनेच्या वतीने सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आल्या आहेत.(Do not take any decision on party symbol, Supreme Court advises, next hearing to be held on Monday)

या याचिकांवर काल सुनावणी झाली. दोन्ही बाजुच्या वकिलांनी जोरदार युक्तिवाद केला. त्यानंतर कोर्टाने या प्रकरणाची सुनावणी आज ठेवली होती. आज हे प्रकरण घटनापीठाकडे जाण्याची शक्यता होती. मात्र तसे झाले नाही. आता या प्रकरणावर येत्या सोमवारी सुनावणी असून, सोमवारी सुप्रीम कोर्ट घटनापीठावरही निर्णय घेण्याची शक्यता आहे.सुप्रीम कोर्टाने निवडणूक आयोगाला कोणतेही आदेश न घेण्याचा आदेश दिला असून प्रकरण पाच न्यायमूर्तींच्या खंडपीठाकडे सोपवण्यासंबंधी निर्णय घेतला जाईल असं सांगितलं आहे. सर्वांचे लिखीत युक्तिवाद पडताळले जातील असंही कोर्टाने सांगितलं आहे. सोमवारी पुढील सुनावणी होणार आहे.

सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी सुरु झाला असता पुन्हा एकदा शिंदे गटाचे वकील हरिश साळवे यांनी १० व्या सूचीचा मुद्दा उपस्थित केला. पक्षांतरबंदी कायदा हा असंतोष विरोधी कायदा असू शकत नाही असा युक्तिवाद हरिश साळवे यांनी केला. तर दुसरीकडे उद्धव ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी हे प्रकरण मोठ्या घटनापीठाकडे सोपवण्याची गरज नाही असं मत मांडलं. दरम्यान सुप्रीम कोर्टाने निवडणूक आयोगाच्या अधिकारांमध्ये हस्तक्षेप करु शकत नाही असं सांगत त्यांना पुढील सुनावणीपर्यंत कोणताही निर्णय घेऊ नका अशी सूचना केली आहे. सोमवारी याप्रकरणी पुढील सुनावणी होणार आहे.