डोळ्यांखालची काळी वर्तुळ घालवण्यासाठी करा हे उपाय , नक्कीच दिसतील चांगले परिणाम …!

पुणे – आजच्या वेगवान जीवनशैलीमध्ये घर कुटुंब आणि ऑफिस अशी तारेवरची कसरत करणाऱ्या महिलांना तसेच अधिकाधिक पैसा कमावण्याच्या स्पर्धेमध्ये पुरुषांना देखील डोळ्याखालची काळी वर्तुळे आणि सॅक या समस्या उद्भवत आहेत . डोळ्याखालची काळी वर्तुळे ही केवळ तुमच्या सौंदर्यालाच कमी करत नाहीत तर तुमच्या शरीरातील एखाद्या आजाराचा देखील संकेत असू शकतो

तुम्ही संपत्ती कमावण्यासाठीजी धावपळ सध्या करत आहात ती संपत्ती ज्यांच्यासाठी आणि ज्या कारणासाठी तुम्ही कमवत आहात तेच जर तुम्ही निरोगी ठेवू शकत नसाल तर गडगंज संपत्तीचा काहीही उपयोग होणार नाही. त्यामुळेच आरोग्य हीच खरी संपत्ती आहे . संपूर्ण शरीराचे आरोग्य राखणे हे जितके महत्त्वाचे आहे तितकेच डोळ्यांचे आरोग्य राखणेही महत्त्वाचे आहे . डोळ्यांची किंमत ही त्या व्यक्तीला विचारावी ज्याला हे सुंदर जग पाहता देखील येत नाही . त्यामुळे आज आपण डोळ्यांचे आरोग्य कसे राखावे आणि डोळ्याखालची काळी वर्तुळे कमी करण्यासाठी कोणत्या सवयी स्वतःला लावून घ्याव्यात हे पाहणार आहोत.

१. रोज व्यायाम करताना डोळ्यांचा पाच मिनिटे तरी व्यायाम आवर्जून करावा . यामध्ये त्राटक करावे . त्राटक करण्यासाठी प्रकाशित मेणबत्तीकडे एक टक पहात रहावे , जोपर्यंत डोळ्यातून पाणी येत नाही . त्यानंतर दोन्ही हाताचे तळवे एकमेकांवर घासून तळवे डोळ्यांवर बंद करून ठेवावेत . काही क्षण तसेच शांत ठेवून डोळे हळू हळू घडावेत.

२. तुम्ही दिवसभर कॉम्प्युटरवर काम करत असाल तर चांगल्या प्रतीचा झिरो नंबरचा चष्मा आवर्जून वापरा . जेणेकरून कॉम्प्युटरमधून येणारी किरणे ही थेट तुमच्या डोळ्यात जाणार नाहीत तसेच जर तुम्हाला डोळ्यांचा नंबर असेल तर वेळोवेळी नंबर तपासून चांगल्या प्रतीचा चष्मा वापरा . तसेच जर तुम्ही लेन्स वापरत असाल तर हे लक्षात ठेवा कि लेन्सचा थेट संपर्क हा डोळ्यांच्या अति नाजूक भागाशी येत असतो. त्यामुळे लेंस रोज न वापरता विशेष प्रसंगी वापरावेत .

३. डोळ्यांची जळजळ होत असेल तर प्रथमतः तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा . डोळ्यांची जळजळ होण्याची प्रमुख कारणे सूर्याची प्रखर किरणे , कॉम्प्युटरवर अधिक वेळ काम करणे , प्रदूषण , डोळ्यांचा नंबर बदलणे आदी असू शकतात . अशा परिस्थितीत योग्य कारण शोधून उपाय करणे महत्त्वाचे ठरते . तसेच वेळोवेळी डोळ्यांवर थंड पाण्याचे शिपके मारावेत . डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य असे आय ड्रॉप वापरावेत . कडक उन्हामध्ये जाताना गॉगल्सचा वापर अवश्य करावा .

४.डोळ्यांना थंडावा देणे – यासाठी तुम्हाला जमेल त्या वेळेत किंवा विशेष करून रात्री झोपण्यापूर्वी डोळ्यांवर थंड पाण्याच्या किंवा निरसे दूध वापरून कापसाच्या पट्ट्या ठेवाव्यात. जेणेकरून डोळ्यांना थंडावा मिळेल. यामुळे डोळ्याखालची काळी वर्तुळे कमी होण्यासाठी चांगली मदत होते.

५. डोळ्यांखाली जर अधिक काळी वर्तुळ किंवा सॅक असतील तर थंड पाण्याच्या पट्ट्या यांसह दिवसाआड मुलतानी मातीचा फेस पॅक पूर्ण चेहऱ्याला लावू शकता . तसेच विशेष करून बदाम निरसे दुधामध्ये उगाळून घेऊन तो लेप डोळ्यांभोवती दहा ते पंधरा मिनिटांसाठी लावून ठेवा . यामुळे डोळ्याखालची काळी वर्तुळे कमी होण्यास नक्कीच मदत मिळेल .

६. आहारामध्ये ‘अ’ जीवनसत्वाचा वापर वाढवा

७. महिलावर्ग जर डोळ्यांचा मेकअप करत असली तर रात्री झोपताना हा मेकअप स्वच्छ नक्की करा . मेकअपचे साहित्य हे चांगल्या प्रतीचे वापरा .

८. सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुमची पुरेपूर झोप होणे हे खूप आवश्यक आहे. रोज किमान आठ तासांची झोप आवश्यक आहे . ही झोप तुमच्या मेंदूला तरतरीत ठेवण्यासही मदत करते . तर तुमच्या डोळ्यांखालची काळी वर्तुळं अधिकाधिक कमी करण्यासाठी देखील परिणामकारक ठरते . तसेच ही झोप शांत लागणे देखील महत्त्वाचे आहे. झोप शांत लागण्यासाठी काय उपाय करावेत ? हे आपण पुढच्या लेखामध्ये पाहूयात , तत्पूर्वी हे उपाय आणि काही सवयी लावून घ्या आणि याचा कसा उपयोग झाला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा .