बँकेत जेवणाच्या नावाखाली टाईमपास केला जात असेल तर मग इथे तक्रार करा, लगेच काम होईल

पुणे – बँकेत (Bank) गेल्यावर बँक कर्मचारी (Employee) जेवणाच्या नावाखाली टाईमपास करत असल्याचे अनेकदा दिसून आले आहे. अशा वेळी तुम्हाला सांगितले जाते की आता दुपारचे जेवण (Lunch) चालू आहे, तुम्हाला नंतर यावे लागेल. अनेकवेळा बराच वेळ थांबूनही ते आपल्या जागेवर येत नाहीत आणि आपला बहुमोल वेळ वाया जातो. तुम्हालाही अशी समस्या असेल तर तुम्हालाही बँकेत अशी तक्रार करायची आहे, तर आम्ही तुम्हाला उपाय सांगणार आहोत.

आता जेवणाच्या बहाण्याने तुमचे काम होऊ न देणाऱ्या या कर्मचाऱ्यांची तक्रार तुम्ही करू शकता. तुम्ही त्याबद्दल बँकिंग लोकपालाकडे तक्रार करू शकता. म्हणजेच जर बँक कर्मचारी तुमचे काम करण्यास नकार देत असतील तर तुम्ही त्याची तक्रार थेट बँकिंग लोकपालाकडे करू शकता.आरबीआयने (RBI) एका आरटीआयला उत्तर देताना सांगितले होते की, बँक अधिकारी एकत्र जेवणाला जाऊ शकत नाहीत. ते एक एक करून लंच ब्रेक घेऊ शकतात. या दरम्यान, सामान्य व्यवहार चालू ठेवावेत. ग्राहकांना तासनतास थांबायला लावणे कायद्याच्या विरोधात आहे.

बँक कर्मचारी काम करत नसेल तर तुम्ही बँकेच्या प्रमुखाकडेही तक्रार करू शकता. ग्राहकांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी प्रत्येक बँकेची स्वतःची यंत्रणा असते. याला तक्रार निवारण प्रणाली म्हणतात जेथे ग्राहक तक्रारी नोंदवू शकतात.तुम्ही बँकेच्या हेल्पलाइन क्रमांकावरही कर्मचाऱ्याची तक्रार करू शकता. तुमची तक्रार संपूर्ण शाखेबद्दल असली तरीही तुम्ही हे करू शकता. यासाठी बँका फोन नंबर जारी करतात. अनेक बँका ऑनलाइन तक्रारी दाखल करण्याची सेवाही देतात. हा हेल्पलाइन क्रमांक तुम्हाला बँकेच्या वेबसाइटवर मिळेल.