हे माहितीय का? रोज अंघोळ न केल्यानेही शरीराला होतात चमत्कारिक फायदे, एकदा वाचा

Bath Care Tips: थंडीच्या ऋतूत (Winter Season) अंघोळ करायला कोणालाच आवडत नाही. आपल्या शरीरासाठी स्वच्छता खूप महत्वाची असते. तथापि, आपल्या देशातील बरेच लोक दररोज अंघोळ करतात, कारण त्यांचा असा विश्वास आहे की दररोज पूजा करण्यासाठी स्नान करणे खूप महत्वाचे आहे. काही लोक म्हणतात की, आपल्या आरोग्यासाठी दररोज स्नान करणे आवश्यक आहे. परंतु, तुम्हाला माहित आहे का की अंघोळ न करण्याचे देखील अनेक फायदे आहेत? चला तर मग, आज आम्ही तुम्हाला सांगतो की रोज अंघोळ न करण्याचे फायदे आणि तुम्ही जरी आंघोळ केली तर मग अंघोळ कशी करावी. (Amazing benefits of not taking bath daily)

काही लोकांना उठताच मोबाईल फोन आणि सोशल मीडियाच्या वापरामुळे अंघोळ करायला वेळ भेटत नसतो. तर काही लोक अंघोळ करण्याचा आळस येत असल्याने एक-दोन दिवसांचे अंतर ठेवून स्नान करतात. पण अशाने शरीराला काही नुकसान होते का? तर उत्तर आहे, नाही.

नॅशनल सेंटर फॉर बायोलॉजिकल इन्फॉर्मेशन (NCBI) मध्ये प्रकाशित झालेल्या संशोधनानुसार, अंघोळ केल्याने मानसिक आणि शारीरिक आरोग्य सुधारते. एका अभ्यासात, दररोज अंघोळ केल्याने तणाव आणि नैराश्यासारख्या लक्षणांमध्ये घट दिसून आली. रोजच्या स्नानाचे फायदे कोणीही नाकारू शकत नाही. पण हिवाळ्यात अंघोळीबाबत काही खबरदारी घेणे अत्यंत आवश्यक आहे.

अनेकदा आपण पाहिलं आहे की, काही लोक लवकर अंघोळ करून 10 मिनिटांत बाहेर पडतात, तर काही अर्ध्या तासात. तज्ञांच्या मते, निरोगी त्वचा आणि चांगल्या आरोग्यासाठी, कोरड्या त्वचेच्या लोकांनी 5 मिनिटे आणि तेलकट त्वचेच्या लोकांनी 8 ते 10 मिनिटे आंघोळ करणे चांगले आहे आणि लक्षात ठेवा की या काळात तुम्ही सामान्य पाण्याचा वापर केला पाहिजे.

रोज अंघोळ न करण्याचे फायदे
आता तुमच्या मनात हा प्रश्न येत असेल की किती वेळा अंघोळ करणे योग्य आहे? अशा परिस्थितीत, आम्ही तुम्हाला सांगतो की संशोधनानुसार, तुम्ही दररोज अंघोळ न केल्याने काही दुष्परिणाम टाळू शकता. म्हणूनच हिवाळ्यात तुम्ही गरजेनुसार किंवा 1 दिवसाच्या अंतरानंतर अंघोळ करू शकता. खूप गरम किंवा थंड पाणी तुमच्या त्वचेला हानी पोहोचवू शकते. अशा स्थितीत पाण्याचे तापमान राखूनच अंघोळ करावी.

कोमट पाण्याने अंघोळ केल्याने आपल्या शरीरातील छिद्रे उघडतात. अशा पाण्याने अंघोळ केल्याने बॅक्टेरिया नष्ट होतात आणि रोगप्रतिकारशक्ती सुधारते. अशा वेळी अंघोळ करण्याबाबतच्या गैरसमजांमध्ये न अडकता या थंडीत शरीराची क्षमता लक्षात घेऊन अंघोळ करावी. गरम पाण्यात अंघोळ करणार्‍यांच्या त्वचेतील केराटिन पेशी मरतात. तर जे लोक रोज अंघोळ करत नाहीत त्याचे केराटिन पेशी जास्त प्रमाणात मरत नाहीत.

जे लोक रोज आंघोळ करतात ते साबण, शाम्पू आणि शॉवर जेल (Soap, shampoo and shower gel) वापरतात. यामुळे त्यांची पीएच पातळी बिघडते. पण जे रोज आंघोळ करत नाहीत ते या समस्येपासून वाचतात. निरोगी त्वचेसाठी, तेलाचा थर आणि चांगले बॅक्टेरिया यांच्यात संतुलन असणे आवश्यक आहे. दररोज आंघोळ केल्याने हे आवश्यक बॅक्टेरिया लवकर नष्ट होतात.

दररोज आंघोळ केल्याने तुमची त्वचा कोरडी होऊ शकते. यासोबतच साबणात केमिकलचे प्रमाण जास्त असल्यास त्वचेचा संसर्ग किंवा ऍलर्जीचा धोकाही वाढतो. तर जे लोक रोज आंघोळ करत नाहीत त्यांच्या त्वचेतील ओलावा टिकून राहते.

आरोग्य आणि जीवनशैली तज्ज्ञांच्या मते, मानवी शरीरात प्रतिपिंड तयार करण्यासाठी आणि प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी रोगप्रतिकारक शक्तीला विशिष्ट प्रमाणात सामान्य जिवाणू सूक्ष्मजीव आवश्यक असतात. जे रोज आंघोळ करत नाहीत त्यांच्यात ते अबाधित राहतात. अशा परिस्थितीत मधेच आंघोळीला ब्रेक लागल्यास काळजी करण्याची गरज नाही. ज्या दिवशी तुम्ही आंघोळ केली नाही त्यादिवशीही तुमच्या अंगाचा वास येऊ नये याकडे तुम्ही लक्ष दिले पाहिजे.