युवकांना कौशल्य प्रशिक्षण देऊन त्यांना सक्षम बनवणारी ही सरकारी योजना तुम्हाला माहिती आहे का?  

युवकांना कौशल्य प्रशिक्षण देऊन त्यांना सक्षम बनवणारी ही सरकारी योजना तुम्हाला माहिती आहे का?

योजनाचा उद्देश
युवकांना विविध कामांमध्ये कौशल्य प्रशिक्षण देऊन त्यांना सक्षम बनवणे हे या योजनेचे मुख्य उदीष्ट आहे. देशातील युवा पिढीसाठी २०२२ मध्ये ही योजना सुरू करण्यात आली आहे. या योजने अंतर्गत, तरुणांना रोजगाराच्यादृष्टीने कौशल्ये प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

योजनेची ठळक वैशिष्ट्ये
■योजनेंतर्गत दिले जाणारे सर्व प्रकारचे प्रशिक्षण हे अत्यंत गांभीर्याने दिले जाईल. वेगवेगळ्या क्षेत्रात प्रशिक्षण घेण्यासाठी वेगवेगळ्या पात्रता निकष असतील. म्हणून, कोणत्याही तांत्रिक क्षेत्रात प्रशिक्षण घेण्यापूर्वी पात्रता तपासली जाणार आहे.
■सर्व प्रशिक्षण कार्यक्रम सेक्टर स्किल कौन्सिल (SSC) घेतील. या योजनेंतर्गत भारत सरकारच्या विविध योजनांमधील आवश्यक कामगारांच्या दृष्टीने प्रशिक्षण दिले जाईल.
■प्रशिक्षणानंतर तरुणांना मेक इन इंडिया योजना, डिजिटल इंडिया प्रकल्प, स्वच्छ भारत अभियान इत्यादी विविध सरकारी योजनांतर्गत नोकरी मिळू शकते.

■योजने अंतर्गत अर्जदारास सुरू करण्यात आलेल्या कोणत्याही एका योजनेत एक वर्षासाठी नोंदणी करणे आवश्यक आहे. अर्जदारास त्याच्याद्वारे निवडलेल्या तांत्रिक क्षेत्राविषयी माहिती असणे आवश्यक आहे.या व्यतिरिक्त, अर्जदाराने उर्वरित एका योजनेत नोंदणी करणे देखील आवश्यक आहे

■अर्जदारला कौशल विकास योजनेच्या https://www.pmkvyofficial.org/ या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन ऑनलाईन अर्ज भरावा लागेल.
■योजनेंतर्गत ३३ विविध क्षेत्रांची निवड करण्यात आली आहे. या विविध क्षेत्रांची या योजनेंतर्गत प्रशिक्षण दिले जाणार आहे.
■वेगवेगळ्या अभ्यासक्रमांसाठी वेगवेगळ्या कालावधी निश्चित केल्या आहेत. साधारणतः असे अनेक अभ्यासक्रम आहेत ज्यांचा कालावधी ३ ते ६ महिने ठेवण्यात आला आहे

संपर्क: कौशल्य विकास, रोजगार व मार्गदर्शन केंद्र, रास्ता पेठ, पुणे