चारचौघात उठून दिसायचय ? मग टाळा या चुका !

घरात असो किंवा ऑफिस मध्ये सण असो किंवा एखादा विशेष समारंभ चारचौघात उठून दिसावं असा प्रत्येक स्त्रीला वाटत असत , बरोबर ना ? आता प्रत्येकीनेच फॅशन डिसाईनिंग किंवा पार्लरचा कोर्स केलेला नसतो . मग अशा वेळी वेगवेगळ्या सोशल मिडिया साईट वरून कपड्यांच्या वेगवेगळ्या स्टाईल किंवा मेकअपच्या ट्रिक्स पासून तसे प्रयोग तुम्ही नक्की ट्राय केलेच असतील . पण अशा काही ट्रिक्स सुद्धा आहेत ज्या सध्या सोप्या आणि खर्चिक नाहीत आणि हो तुम्ही जर माझ्या सारख्या असाल अर्थात छान तर दिसायचं पण स्वतःची काळजी घ्यायला कंटाळा येतो तर या ट्रिक्स तुम्हाला मदत करू शकतात.

तर मग सुरुवात करूयात घरात कसे छान दिसाल . अचानक कोणी घरी आले , किंवा घरातल्यांसमोर आणि मुख्य म्हणजे स्वतःलाच स्वतःचे कौतुक वाटावे म्हणून पहिले तर कपड्यांचे सिलेक्शन करा . बऱ्याच जणी रात्री झोपताना घालायचे कपडे आणि दिवभर घरात घालायचे कपडे यात गल्लत करतात . नक्कीच घरात कपड्यांची सहजता याला तुम्ही महत्व द्याल तर यासाठी रात्री झोपताना गाऊन घालणे , किंवा शॉर्ट्स आणि टॉप घालणे जे तुम्हाला पसंत असेन ते वापर , पण दिवसभर हे कपडे घालून तुम्ही स्वतःचे व्यक्तिमत्व खराब करत आहात . घरात साधे पंजाबी , थ्री-फोर्थ पँट्स-टॉप , प्लाझो , सिम्पल वनपीस असे काही कपडे वेगळे करा . घरात जरी असलात तरी केस नीट विंचरून पोनी किंवा क्लचरने बांधा . चेहऱ्याला चांगले मॉइश्चराइजर लावा . घरातच आहेना म्हणून गबाळे राहू नका . ते तुमचाच उत्साह कमी करते .

आता येउयात ऑफिस लुककडे तर अर्थात तुम्हाला फॉर्मल लुक नेसेसरी असणार तर मग फॉर्मल पॅन्ट आणि फॉर्मल शर्टवर छानशी पोनी टेल बांधा . जर तुम्हाला केस कसे बांधावे असा रोजच गोंधळ होत असेंन तर शॉर्ट हेअर कट ट्राय करा . न्यूड लिपस्टिक , तुमच्या व्यक्तिमत्वाला शोभेल असे छानसे घड्याळ . कानात मोती किंवा खडा असलेले कानातले . फॉर्मल शूज अँड देअर यु गो …. ! ऑफिस मध्ये उगाच स्टाइलिंगचे प्रयोग करू नका .

आता मूळ मुद्यावर येउयात म्हणजे सण आणि समारंभात कसे तयार व्हावे . तर सण असेंल तर विशेष करून पारंपरिक साड्यांना बाहेरची हवा लागू द्या . म्हणजे त्या कधीही आऊट डेटेड होत नाहीत . बस त्यावर योग्य ब्लाउज निवडा . थोडं ट्रेंड काय आहे हे सर्च करत राहा . अशा वेळी जर काठपदर आणि साडी प्लेन असेंन तर हेवीवर्क ब्लाउज निवडू शकता . काँट्रास कलर देखील सध्या ट्रेंड मध्ये आहेत ,त्यावर आपण पुढच्या लेखात पाहुयात . किंवा हेवी वर्क साडीवर प्लेन ब्लाउज निवडू शकता . ज्वेलरी निवडताना साडीचा पदर आणि प्रकारानुसार निवडा अर्थात साडी प्लेन असें तर थोडे ब्रॉड गळ्यातले , कानातले , बांगड्या , नथ निवडू शकता . पण खरी अडचण इथेच येते , तर एक लक्षात ठेवा एका वेळी एकच दागिना फ्लोन्ट करा . तुम्ही ब्रॉड नेकलेस निवडले असें तर बाकी दागिने अगदी नाजूक निवडा .

समारंभाला जात असाल तर डिझाइनर साड्या , सिल्क , पेपर टिशू हे खूप उठून दिसतात . आणि दागिने जो आवडेल तो घाला पण एका वेळी एकाच फ्लोन्ट करा . म्हणजे ज्वेलरीचे दुकान नको ना कोणी म्हणायला ? हो तर सांगायचं मुद्दा असा कि एकच दागिना साडीला शोभेल असा निवडा . मेकअप तुम्हाला करायला आवडत असेंन तर एखादा कोर्स करायला हरकत नाही . सध्या असे अनेक कोर्स आहेत ज्यात अगदी एका दिवसात तुम्ही स्वतःचा मेकअप कसा करायचा ते शिकू शकता . म्हणजे तुम्हाला कोणते फौंडेशन , लिपस्टिक , आयलायनर कसे वापरायचे हे कळेल .साडी नेसण्याची योग्य पद्धत शिकता येईन . किंवा एखादी डार्क शेड लिपस्टिक तरी नक्की करा . ते तुमच्या रोजच्या सिम्पल लुकला चेंज करेन तसेच जमत असेंन तर लायनर आणि काजळ तुमचा लूक पूर्ण करेन .

तर मग कसा वाटलं आजचा लेख आम्हाला कमेंट करून नक्की कळवा .