Rahul Gandhi | हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९५ व्या जयंतीनिमित्त सर्वत्र अभिवादन करण्यात येत असताना काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या ट्वीटमुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. राहुल गांधी यांनी जयंतीच्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराज यांना श्रद्धांजली वाहिली, यावरून भाजप आणि महायुतीच्या नेत्यांनी तीव्र आक्रमक भूमिका घेतली आहे.
शिवसेना प्रवक्त्या डॉ. ज्योती वाघमारे यांनी राहुल गांधींवर कठोर शब्दांत टीका करत, “राहुल गांधींच्या मेंदूला मूळव्याध झालाय का?” असा सवाल उपस्थित केला. त्यांनी राहुल गांधींना ( Rahul Gandhi) “अफजलखान फॅन क्लबचे अध्यक्ष” असे संबोधत, चौथीच्या इतिहासाचे पुस्तक पाठवण्याचा उपरोधात्मक इशारा दिला.
डॉ. वाघमारे पुढे म्हणाल्या, “त्यांचे आजोबा पं. जवाहरलाल नेहरूंपासून चालत आलेला शिवद्वेष राहुल गांधींनी आपल्या कृतीतून पुन्हा एकदा दाखवून दिला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील जनता भविष्यात काँग्रेस पक्षालाच श्रद्धांजली वाहील.” तसेच, राहुल गांधींनी यापुढे अफजलखान आणि शहिस्तेखान यांच्या नावावर मते मागावी, असा घणाघातही त्यांनी केला.
राहुल गांधी यांच्या या ट्वीटवरून राजकीय वातावरण तापले असून भाजप आणि शिवसेनेने त्यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. यावर काँग्रेसकडून अजून अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही.
आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअॅप ग्रुप
महत्वाच्या बातम्या :
छत्रपती शिवाजी महाराजांच्या अवमानाबद्दल माफी तर भाजपानेच मागावी | Atul Londhe
“बालकांचे संरक्षण आणि शिक्षणाची गुणवत्ता हा आमचा प्राधान्यक्रम” – Dada Bhuse