अनाधिकृत व अतिक्रमण असलेल्या मशिदींवर भोंग्यांना परवानगी देऊ नका- भाजपा

नाशिक – राज्यात मशिदीवरील भोंग्याचा वाद सुरू असताना नाशिकच्या पोलीस आयुक्तांनी महत्त्वपूर्ण आदेश दिले आहेत. नाशिकमधील ( Nashik ) 3 मे पर्यंत मशीदच नव्हे तर सर्वच धार्मिक स्थळांवरच्या भोंग्यांना परवानगी घ्यावी लागणार आहे. त्यानंतर पोलिसांकडून कारवाई करण्यात येणार आहे. नाशिक पोलीस आयुक्त दीपक पांडे ( Nashik Police Commissioner Deepak Pandey ) यांच्या या आदेशाची आता चर्चा सुरू झाली आहे. नाशिकमध्ये जातीय तेढ निर्माण न करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.

दरम्यान, आता अनाधिकृत व अतिक्रमण असलेल्या मशिदींवर भोंग्यांना परवानगी देऊ नये अशी मागणी भाजपने केली आहे. भाजप नेते प्रदीप पेशकार ( Pradeep Peshkar ).यांनी पोलिस आयुक्त दीपक पांडे यांच्याकडे ही मागणी केली आहे. या चर्तेचेदरम्यान म्हणाले, सध्या महाराष्ट्रात व इतर राज्यातही धार्मिक स्थळावरील प्रार्थनेसाठी लावलेल्या भोंग्यांवरुन मतमतांतरे सूरु आहेत. अशा परिस्थितीत आपण एक आदेश पारित केला त्यामध्ये परवानगी घेणेबाबत चा उल्लेख दिसून येतो. याविषयी आपणास सूचित करू इच्छितो की अनेक ठिकाणी अनेक धार्मिक स्थळे अनधिकृत जागेवर किंवा अतिक्रमित जागेवर असण्याची शक्यता आहे.

त्यामुळे अशा धार्मिक स्थळाबाबत भोंग्याची परवानगी देताना त्या धार्मिक स्थळाची आजची स्थिती लक्षात घेऊन जागेचे पेपर्स, बांधकामाचा मंजूर नकाशा, तसेच महापालिकेचा पूर्णत्वाचा दाखला तत्सम इतर कागदपत्रे तपासूनच आपण नियमाप्रमाणे परवानगी द्याल अशी आशा व्यक्त करतो. सर्व धर्मियांसाठी नियमावलीची काटेकोरपणे अंमलबजावणी व्हावी ही अपेक्षा व्यक्त करतो.असं पेशकार यांनी म्हटले आहे.