कोरोना काळाता रुग्णसेवा देणाऱ्या अधिपरिचारिकांना कामावरुन कमी करु नका – आ. जोरगेवार

कोरोना काळाता रुग्णसेवा देणाऱ्या अधिपरिचारिकांना कामावरुन कमी करु नका - आ. जोरगेवार

चंद्रपूर –  कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतील वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता कंत्राटी पध्दतीवर अधिपरिचारीकांची नियुक्ती करण्यात आली होती. आता कोरोनाची दुसरी लाट ओसरताच सदर कर्मचाऱ्यांना कामावरुन कमी करण्यास सुरवात झाली आहे. मात्र कोरोनाची संभावीत तिसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेता सदर सर्व कर्मचाऱ्यांना कर्तव्यावर कायम ठेवण्यात यावे अशा सुचना आमदार किशोर जोरगेवार यांनी जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांना केल्या आहे. सदर पत्रही त्यांच्या वतीने जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांना देण्यात आले आहे.

काही महिण्यांपूर्वी कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने राज्यासह चंद्रपूर जिल्हातही चांगलाच कहर घातला. अनपेक्षित वाढत्या रुग्णसंख्येमूळे आरोग्य व्यवस्था तोकडी पडली. त्यामूळे कंत्राटी पध्दतीवर आरोग्य सेवक – सेवीका तथा अधिपरिचारीकांची नियुक्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानूसार जिल्हाधिकारी कार्यालया मार्फत अधिपरिचारक व अधिपरिचारिकांच्या जागा भरण्यात आल्या होत्या.

सदर अधिपरिचारिकांनी कोरोना महामारीच्या काळात स्व:ताच्या जिवाची पर्वा न करता अहोरात्र रुग्णसेवा केली. या कार्याबदल कोरोना योध्दा म्हणून त्यांचा सन्मानही करण्यात आला. मात्र आता कोरोनाची दुसरी लाट ओसरताच सदर कर्मचाऱ्यांना कामावरुन कमी केल्या जात आहे. संकटकाळात सेवा देणा-या कर्मचाऱ्यांवर हा अन्याय आहे. तसेच कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यताही तज्ञांमार्फत वर्तविण्यात येत आहे. अशा परिस्थितीत सदर कर्मचाऱ्यांचा अनूभव कामी येणार आहे. या सर्व परिस्थितीचा विचार करता सर्व अधिपरिचारक व अधिपरिचारिकांना कामावरुन कमी न करता त्यांची सेवा वाढविण्यात यावी अशा सूचना सदर पत्राच्या माध्यमातून आमदार किशोर जोरगेवार यांनी जिल्हाधिकारी यांना केल्या आहे.

https://www.youtube.com/watch?v=Z4Y6-snAmEc&t=103s

Previous Post

शत्रुघ्न सिन्हा यांची मुलगी होणार सलीम खानची सून? सोनाक्षीने सांगितले…

Next Post
राज्यातील ऊर्जाक्षेत्र सध्या प्रचंड अडचणीतून मार्गक्रमण करत आहे : ऊर्जामंत्री 

राज्यातील ऊर्जाक्षेत्र सध्या प्रचंड अडचणीतून मार्गक्रमण करत आहे : ऊर्जामंत्री 

Related Posts
उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेबरोबर वंचितने युती केली हे माध्यमातून समजले  - अजित पवार

उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेबरोबर वंचितने युती केली हे माध्यमातून समजले  – अजित पवार

मुंबई  –  शिवसेना – वंचित यांच्या युतीबाबत आमच्या नाराजीचा प्रश्न येतो कुठे? का गैरसमज पसरवत आहात असा थेट…
Read More
हानिकारक लिपस्टिक : लिपस्टिकमध्ये असे काय असते जे शरीरात जाते आणि आजारांना जन्म देते!

हानिकारक लिपस्टिक : लिपस्टिकमध्ये असे काय असते जे शरीरात जाते आणि आजारांना जन्म देते!

असे म्हणतात की लिपस्टिक (lipstick) ही महिलांची पक्की मैत्रीण असते. त्यामुळे तिचा लूक पूर्ण होतो. पण महिलांचे सौंदर्य…
Read More
जनता स्वयंभू नेत्यांनाच मान देते, इतरांनी शेंदूर फासलेल्या दगडांना नव्हे; संजय राऊतांचा राज ठाकरेंना टोला

जनता स्वयंभू नेत्यांनाच मान देते, इतरांनी शेंदूर फासलेल्या दगडांना नव्हे; संजय राऊतांचा राज ठाकरेंना टोला

Mumbai: मुंबईत बुधवारी झालेल्या एका कार्यक्रमात अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांची…
Read More