आम्ही शांत बसलोत म्हणजे आमच्याकडे काहीच नाही असं समजू नका; मुंडेंचा दमानियांना इशारा

आम्ही शांत बसलोत म्हणजे आमच्याकडे काहीच नाही असं समजू नका; मुंडेंचा दमानियांना इशारा

सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावरुन मंत्री धनंजय मुंडे ( Dhananjay Munde) आणि सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया आमनेसामने आले आहेत. अंजली दमानिया या सातत्याने धनंजय मुंडे यांच्यावर आरोप करत आहेत. त्यांनी धनंजय मुंडे यांच्याविरोधात बरेचसे पुरावेही शोधून काढले असल्याचे ते सांगतात. आता धनंजय मुंडे यांनी दमानिया यांच्या आरोपांवर प्रत्युत्तर दिले आहे.

मंगळवारी मुंबईतील एका पत्रकार परिषदेत बोलताना मुंडे ( Dhananjay Munde) म्हणाले की, अंजली दमानिया यांनी बीड जिल्हा आणि येथील लोकांना बदनाम करण्याचे प्रयत्न केले. त्यांनी आजवर अनेकांवर आरोप केले. मात्र, त्यापैकी एकही आरोप सिद्ध झालेला नाही. अंजली दमानिया यांना राजकारणात पुन्हा यायचे असेल. त्यामुळे स्वत:ची न्यूज व्हॅल्यू वाढवण्यासाठी अंजली दमानिया अशाप्रकारे आरोप करत आहेत का, हे बघितले पाहिजे.

अंजली दमानिया यांचे आरोप धादांत खोटे आहेत. आम्ही शांत बसलो आहोत, असे कोणीही समजू नये. आम्हाला बोलता येत नाही किंवा आमच्याकचे काहीच नाही, असा समज कोणीही करुन घेऊ नये, असा इशारा मंत्री धनंजय मुंडे यांनी दिला.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

शिवसेनेचे मंत्री आठवड्यातून तीन दिवस जनतेच्या भेटीला

आळंदीतील अनधिकृत वारकरी शिक्षण संस्थांवर ४८ तासात कारवाई करा- Rupali Chakankar

नक्षलवाद्यांनी घरात घुसूत फरफटत बाहेर नेलं अन् माजी सभापतीला निर्दयीपणे संपवलं

Previous Post
धक्कादायक! मुंबईत अल्पवयीन शाळकरी मुलीला अज्ञात व्यक्तीचे टोचले इंजेक्शन दिले

धक्कादायक! मुंबईत अल्पवयीन शाळकरी मुलीला अज्ञात व्यक्तीचे टोचले इंजेक्शन दिले

Next Post
वर्षा बंगल्यावरील लॉनमध्ये रेड्यांची शिंग पुरलेत'; राऊतांच्या दाव्यावर एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया

वर्षा बंगल्यावरील लॉनमध्ये रेड्यांची शिंग पुरलेत’; राऊतांच्या दाव्यावर एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया

Related Posts
ठाकरे गटातून आउटगोइंग सुरूच; माजी सभागृह नेत्या तृष्णा विश्वासराव शिंदे गटात

ठाकरे गटातून आउटगोइंग सुरूच; माजी सभागृह नेत्या तृष्णा विश्वासराव शिंदे गटात

Mumbai – उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या माजी नगरसेविका, माजी सभागृह नेत्या आणि सात वेळा नगरसेविका म्हणून निवडून आलेल्या…
Read More
टंकलेखन कौशल्य चाचणीत ज्यांना तांत्रिक अडचण आली फक्त त्यांचीच फेर परीक्षा घेण्याची काँग्रेसची मागणी 

टंकलेखन कौशल्य चाचणीत ज्यांना तांत्रिक अडचण आली फक्त त्यांचीच फेर परीक्षा घेण्याची काँग्रेसची मागणी 

मुंबई –  महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) गट-क अंतर्गत सहाय्यक व लिपीक आणि टंकलेखक या पदासाठी परीक्षा घेण्यात आली…
Read More
मराठी अभिनेत्री सई ताम्हणकरचा लेस्बियन लिपलॉक, 'क्राईम बीट'चा ट्रेलर होतोय व्हायरल

मराठी अभिनेत्री सई ताम्हणकरचा लेस्बियन लिपलॉक, ‘क्राईम बीट’चा ट्रेलर होतोय व्हायरल

टीव्हीनंतर ओटीटी प्लॅटफॉर्म आल्याने प्रेक्षकांना वेबसीरिजचे वेड लागले आहे. प्रेक्षकांच्या मागणीनुसार चित्रपट निर्मातेही वेगवेगळे प्रयोग करताना दिसत आहेत.…
Read More