वाढवण प्रकल्पामुळे राज्याच्या विकासाला मिळणार बूस्टर, अर्थव्यवस्थेला मिळणार गती | Maharashtra Economy

वाढवण प्रकल्पामुळे राज्याच्या विकासाला मिळणार बूस्टर, अर्थव्यवस्थेला मिळणार गती | Maharashtra Economy

Maharashtra Economy | 30 ऑगस्ट 2024 हा दिवस महाराष्ट्राच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिण्याचा दिवस आहे. या दिवशी मुंबई नजीकच्या पालघर जिल्ह्यातील वाढवण येथे महाकाय बंदराचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रकल्पाच्या माध्यमातून महामुंबई परिसर, महाराष्ट्र आणि संपूर्ण भारत देश यांच्या आर्थिक विकासासाठी एक नवे दालन खुले झाले आहे. भारत देश सागरी शक्ती केंद्र म्हणून भविष्यात नावारूपाला येण्याचा हा शिलान्यास आहे.

शेती, उद्योग, लॉजिस्टिक्स अशा अनेक क्षेत्रांना भरभराटीचे दिवस आणण्याची क्षमता या एका प्रकल्पात आहे. त्यामुळे हे बंदर महाराष्ट्राच्या विकासाची पायाभरणी ठरणार आहे.

आणखी एका बंदराची देशाला गरज
समुद्रमार्गे जलवाहतूक हा वाहतुकीचा सर्वात स्वस्त प्रकार मानला जातो. भारताच्या किनाऱ्यावरून समुद्र मार्गाने विदेशात व्यापाराचा मोठा इतिहास आहे. वास्को-द-गामा हा केप ऑफ गुड होप ला वळसा घालून भारताच्या किनाऱ्यावर आला होता. भारतीय मसाले, कापड, रेशीम अशा अनेक वस्तूंची निर्यात समुद्रमार्गेच होत असे. ब्रिटिश आणि भारत यांच्यातील व्यवहारही समुद्र मार्गाने होत असतं.

भारताला आणि महाराष्ट्रालाही मोठा समुद्रकिनारा लाभला आहे. मुंबई बंदराने महाराष्ट्राला आणि मुंबईला सोन्याचे दिवस दाखवले. आजघडीला जेएनपीटी बंदर देशातले सर्वात महत्त्वाचे बंदर मानले जाते. या बंदरामुळे महा मुंबई परिसराला वेगळी सोबत आली आहे. विदेशाशी व्यापार उदीम वाढल्यामुळे जेएनपीटी बंदरावरील ताण सातत्याने वाढत होता. त्यामुळे आणखी एका बंदराची महाराष्ट्राला (Maharashtra Economy) गरज होती आणि त्याचा शोध वाढवणे येथे पूर्ण झाला.

अनेक वर्षे रखडला प्रकल्प
मोठी जहाजे नांगरण्यासाठी आवश्यक असलेली अधिकची खोली हे वाढवणच्या किनाऱ्याचे वैशिष्ट्य. येथे बंदर उभारण्याचे अनेक वर्षांपासून सरकारच्या मनात होते. परंतु राजकीय इच्छाशक्तीच्या अभावामुळे जसे राज्यातील अनेक प्रकल्प मागे पडले त्यात वाढवणचाही समावेश होतो. 2014 साली राज्यात शिवसेना भाजपा युतीचे सरकार आल्यानंतर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले आणि त्यांनी या प्रकल्पाला चालना दिली.

2019 साली जनतेने पुन्हा युतीला कौल दिला पण उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीची युती केली आणि महाराष्ट्रातले अनेक लोककल्याणकारी प्रकल्प बारगळले त्यात वाढवणचाही समावेश होता. 2022 साली महाराष्ट्रात सत्तापालट झाला आणि एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस ही जोडगोळी सत्तेत आली आणि विकासाच्या असंख्य प्रकल्पांना पुन्हा चालना देण्यात आली. त्यातही वाढवणचा प्रामुख्याने समावेश होता. स्थानिक मच्छीमारांची समजूत घालणे, जन सुनावणी घेणे, विविध यंत्रणांच्या परवानगी प्राप्त करणे असे अनेक सोपस्कार शिंदे फडणवीस या जोडगोळीने पूर्ण केले.

अन्य राज्यांच्या स्पर्धेत महाराष्ट्राची बाजी
एकेकाळी महाराष्ट्र सर्वच बाबतीत प्रथम क्रमांकावर होता परंतु आता अनेक राज्यांची स्पर्धा महाराष्ट्राला करावी लागत आहे. वाढवण सारख्या बंदराच्या निर्मितीसाठी अनेक राज्य उत्सुक होती त्यांनी केंद्राकडे विनंतीही केली होती. मात्र नैसर्गिक खोली, अनुकूल भौगोलिक परिस्थिती, केंद्राचे महाराष्ट्रावरील प्रेम आणि शिंदे-फडणवीस-अजित पवार यांची इच्छाशक्ती या बळावर महाराष्ट्राने बाजी मारली आणि 76 हजार कोटी रुपयांचा हा महाकाय प्रकल्प महाराष्ट्रासाठी मंजूर झाला. नुकतीच केंद्राने याला मान्यता दिली आणि आज या प्रकल्पाचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पूर्ण झाले.

वाढवणची व्याप्ती जेएनपीटीच्या तिप्पट
आजघडीला जेएनपीटी ते बंदर सर्वात मोठे बंदर मानले जाते. मात्र वाढवण हे जेएनपीटीच्या तिपटीने मोठे बंदर आहे. पूर्ण झाल्यानंतर ते भारतातील सर्वात मोठे बंदर ठरणार आहे. जगातील पहिल्या 10-बंदरांमध्ये वाढवणचा समावेश होणार आहे. देशात एकूण बंदरांची कंटेनर क्षमता जितकी आहे ती वाढवणच्या पूर्ततेनंतर दुपटीने वाढणार आहे आणि 298 मिलियन मॅट्रिक टन इतकी होणार आहे. सहाजिकच उद्योगांचा मोठा ओघ महाराष्ट्राकडे वाढणार आहे. वाढवण बंदर महाराष्ट्राला देशाचे ग्रोथ इंजिन म्हणून पुन्हा प्रस्थापित करणार आहे. पालघर, डहाणू बोईसर या महाराष्ट्रातील तुलनेने मागास असलेल्या भागाचा मोठा कायापालट या बंदराच्या माध्यमातून होणार आहे.

समृद्धी महामार्ग वाढवणला जोडणार
देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि एकनाथ शिंदे त्रयी दूरदर्शी नेतृत्व म्हणून ओळखली जाते. समृद्धी महामार्ग वेळेत पूर्ण करून शिंदे फडणवीस जोडगोळीने एक विक्रम प्रस्थापित केला आहे. एमटीएचएल अर्थात अटल सेतू देखील फडणवीस यांच्या प्रयत्नातून पूर्णत्वास आला आहे. वाढवण बंदर पूर्ण होणारच हे मनाशी निश्चित करून समृद्धी महामार्ग वाढवण बंदराला जोडण्याचा प्रस्ताव मंजूर झाला आहे. त्यामुळे विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र हा परिसर थेट सागरी वाहतुकीशी जोडल्या जाणार आहे

महाराष्ट्राच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेलाही मिळणार चालना
आज समृद्धी महामार्ग महाराष्ट्राच्या दहा जिल्ह्यातील 392 गावांतून जातो. म्हणजेच विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतीमाल तसेच औद्योगिक उत्पादने वेगाने बंदर मार्गे विदेशात जाऊ शकतील साहजिकच महाराष्ट्राच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळणार आहे.

पर्यावरणाचीही काळजी घेणार
महाकाय प्रकल्प आले की पर्यावरण संरक्षणाची काळजी व्यक्त केली जातेच. वाढवण बंदर उभारताना डहाणू परिसरातील पर्यावरणाची काळजी घेण्यात येणार आहे या बंदराची उपयुक्तता लक्षात घेऊन 15 मच्छीमार संस्थाने या बंदराला आधीच पाठिंबा दिला आहे. महाराष्ट्राचे आर्थिक चित्र बदलून टाकणाऱ्या या प्रकल्पाची पूर्ती गतीने व्हावी अशीच राज्याची इच्छा आहे.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

Previous Post
पत्नीपाठोपाठ रवींद्र जडेजाचाही राजकारणात एन्ट्री, बनला भाजपचा प्राथमिक सदस्य | Ravindra Jadeja Politics

पत्नीपाठोपाठ रवींद्र जडेजाचाही राजकारणात एन्ट्री, बनला भाजपचा प्राथमिक सदस्य | Ravindra Jadeja Politics

Next Post
भारताबाहेर केनियातही विमानतळाचे काम पाहणार गौतम अदानी, सुरू आहेत प्रयत्न | Gautam Adani

भारताबाहेर केनियातही विमानतळाचे काम पाहणार गौतम अदानी, सुरू आहेत प्रयत्न | Gautam Adani

Related Posts
नवनगर प्राधिकरणाने उभालेल्या गृहनिर्माण सोसायट्यांना आता ‘फ्री होल्ड’चा पर्याय!

नवनगर प्राधिकरणाने उभालेल्या गृहनिर्माण सोसायट्यांना आता ‘फ्री होल्ड’चा पर्याय!

Mahesh Landge | पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण प्रशासनाने बांधलेल्या गृहनिर्माण सोसायटी व गृहप्रकल्प ‘फ्री होल्ड’ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय…
Read More
Nota

1 लाख रुपयांमध्ये घरबसल्या हा उत्तम व्यवसाय सुरू करा, दरमहा 60,000 रुपये कमवा

पुणे – जर तुम्ही घरी बसून व्यवसाय (Business) करू इच्छित असाल तर आज आम्ही तुमच्यासाठी एक चांगली कल्पना…
Read More
.... तर तर शेतकरी उद्ध्वस्त व्हायला वेळ लागणार नाही; शरद पवारांनी व्यक्त केली भीती

…. तर तर शेतकरी उद्ध्वस्त व्हायला वेळ लागणार नाही; शरद पवारांनी व्यक्त केली भीती

Sharad pawar – कांदा हे जिरायती शेतकऱ्यांचं पीक आहे. कांदा असं पीक आहे की, त्यामधून दोन पैसे मिळतात.…
Read More