‘कोरोना काळात शिंदेंनी जनतेची सेवा केली घरात बसून टीव्हीवरून ज्ञान देत बसले नव्हते’

मुंबई : शिवसेनेतील फुटीनंतर मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Chief Minister Eknath Shinde and Shiv Sena chief Uddhav Thackeray) यांच्या नेतृत्वात दोन वेगवेगळे मेळावे होत आहेत.या पार्श्वभूमीवर दोन्ही गटांनी आपली ताकत दाखवून देण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु केले आहेत.

बीकेसी मैदानात शिंदे गटाचा जबदस्त असा मेळावा पार पडला. या मेळाव्यात शिंदे गटाच्या नेत्या शीतल म्हात्रे यांनी जोरदार भाषण केले. त्या म्हणाल्या, आम्ही बाळासाहेबांच्या संपत्तीचे आम्ही वारस नासुद्या पण आम्ही विचारांचे वारसदार आहोत असं ठणकावून सांगितले. कोरोनाकाळात शिंदे साहेब पीपीई कीट घालून रुग्णालयात जाऊन रुग्णांची आणि सामान्य जनतेची काळजी घेत होते. ते घरात बसून टीव्हीवरून ज्ञान देत बसले नव्हते असं म्हणत उद्धव ठाकरेंना टोला लगावला. न्यायालयात काय निर्णय लागेल ते लागेल मात्र जनता ही शिंदे साहेबांच्या सोबत आहे हे सिद्ध झाले आहे असं त्या म्हणाल्या.