पुण्यात ओमायक्रॉनचा शिरकाव, आरोग्य विभागाचे धाबे दणाणले

पुणे : 24 नोव्हेंबर रोजी दक्षिण आफ्रिकेतील केपटाऊन शहरामधून दुबई आणि दिल्लीमार्गे मुंबईमध्ये परतलेल्या 33 वर्षीय तरुणामध्ये ओमिक्रॉन हा कोविड-19 चा नवा प्रकार आढळल्याचं त्याच्या प्रयोगशाळा अहवलातून सिद्ध झालं आहे. या नवीन विषाणू प्रकाराचा राज्यातील हा पहिला रुग्ण आहे.

कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील हा तरुण रहिवासी असून त्याचं लसीकरण अद्याप झालेलं नाही अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. दरम्यान, त्याची लक्षणं सौम्य स्वरूपाची असून तो सध्या कल्याण डोंबिवली इथल्या कोविड केअर सेंटरमध्ये उपचार घेत आहे.

त्यानंतर आता राज्यभर ओमिक्रॉनचा झपाट्याने प्रसार होत असल्याचे पाहायला मिळत आहे. आता पुण्यात देखील ओमायक्रॉनचा शिरकाव झाल्याने आरोग्य विभागाचे धाबे दणाणले आहेत. पिंपरी-चिंचवडमध्ये 6 तर पुण्यात 1 रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानं खळबळ माजली आहे. पिंपरी चिंचवडमधील 44 वर्षीय रुग्ण बहिणीला भेटायला आला होता, त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे आरोग्य विभागाची चिंता वाढली आहे. नायजेरियातून आलेल्या तरूणाला ओमिक्रॉन झाल्याचं समोर आलं आहे.

तिघे नायजेरियाहून आले आहेत. त्यापैकी इतर तिघे त्यांच्या संपर्कात आले होते. यात एक महिला महिला आणि त्यांचा 45 वर्षाचा भाऊ, दीड वर्ष आणि 17 वर्षाच्या मुलींचाही समावेश आहे. 24 नोव्हेंबरला नायजेरियाची नागरिक असणारी भारतीय वंशाची महिला पिंपरी-चिंचवडमध्ये आली होती, ज्या 18 वर्षाखालील तीन लहान मुलांचा समावेश आहे त्यांनी कोणतीही लस घेतलेली नाही, तर आणखी एक बाधित तरुण फिनलंडवरून आला होता.