ईस्टर्न नागालँड पीपल्स ऑर्गनायझेशननं आगामी विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला मागे

वेगळ्या राज्याची मागणी करणाऱ्या नागालँडमधील ईस्टर्न नागालँड पीपल्स ऑर्गनायझेशननं आगामी विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय मागं घेतला आहे. गृह मंत्रालयाच्या विनंतीनंतर आणि केंद्रीय गृहमंत्र्यांनी दिलेल्या आश्वासनानंतर हा निर्णय घेण्यात आल्याचं या पक्षानं काल जारी केलेल्या अधिकृत निवेदनात म्हटलं आहे.

Amit Shah : वेगळ्या राज्याची मागणी करणाऱ्या नागालँडमधील ईस्टर्न नागालँड पीपल्स ऑर्गनायझेशननं आगामी विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय मागं घेतला आहे. गृह मंत्रालयाच्या विनंतीनंतर आणि केंद्रीय गृहमंत्र्यांनी दिलेल्या आश्वासनानंतर हा निर्णय घेण्यात आल्याचं या पक्षानं काल जारी केलेल्या अधिकृत निवेदनात म्हटलं आहे. राज्यातील निवडणुका निष्पक्ष आणि शांततेत पार पाडण्यासाठी दिमापूर इथं काल झालेल्या कार्यकारिणीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. नागालँडचे मुख्यमंत्री नेफियु रिओ यांनी या निर्णयाचं स्वागत केलं आहे.

ईस्टर्न नागालँड पीपल्स ऑर्गनायझेशनच्या या निर्णयाचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी स्वागत केलं आहे. E N P O नं केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील सरकारवर विश्वास ठेवत हा निर्णय घेतला; या निर्णयामुळे शांतता आणि विकासाची सुरू असलेली प्रक्रिया सुरू राहण्यास मदत होईल असं अमित शहा यांनी म्हटलं आहे.

लोकशाही प्रक्रियेसाठी E N P O च्या सकारात्मक भावनेबद्दल शाह यांनी ट्विटरद्वारे आभार व्यक्त केले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ईशान्य भारतातील लोकांना आश्वस्त करण्यासाठी अविरत प्रयत्न केले असून ई एन पी ओ चे हे पाऊल मोदी यांच्या प्रयत्नांना दिलेलं समर्थन असल्याचं शाह यांनी म्हटलं आहे.