डोकं शांत ठेवण्यासाठी रंजनीगंधा खा; जितेंद्र आव्हाडांचा मुस्लिमांना सल्ला

डोकं शांत ठेवण्यासाठी रंजनीगंधा खा; जितेंद्र आव्हाडांचा मुस्लिमांना सल्ला

ठाणे – राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड हे नेहमीच वेगवेगळ्या कारणांसाठी चर्चेत असतात. कधी ते त्यांच्या कृतीमुळे चर्चेत राहतात टर कधी वादग्रस्त वक्तव्ये केल्याने चर्चेत राहतात. आता डोकं शांत ठेवण्यासाठी पानमसाला खा असा सल्ला जितेंद्र आव्हाड यांनी दिला आहे.

मुस्लिमांना डोकं शांत ठेवा असा सल्ला देताना जितेंद्र आव्हाड यांनी त्यांनी पानसुपारी,रजनीगंधा, पानमसाला खा असं सांगितलं. भिवंडी शहरातील जकात नाका परिसरात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहर जिल्हा अध्यक्ष शोएब खान गुड्डू यांच्या कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

मुस्लीमांना भडकवण्यासाठी काहीजणांचे प्रयत्न सुरु आहेत… असा आरोप जितेंद्र आव्हाडांनी यावेळी केला.. तर दुसरीकडे मुस्लिमांना शांत राहण्याचा सल्लाही आव्हाडांनी दिला. मात्र पान, सुपारी, रंजनीगंधा खा असा सल्ला आव्हाड यांनी दिल्याने वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

नेमकं काय म्हणाले आव्हाड ?

“जास्त मांस खाऊन डोकं गरम करू नका. तुमचं डोकं शांत ठेवा. तुमचं डोकं गरम व्हावं हेच तुमच्या विरोधकांना हेच हवे आहे, पण तुम्ही शांत राहा, डोक्यावर बर्फ ठेवा”. तोंडात पान, सुपारी, रंजनीगंधा, पानमसाला जे हवं ते ठेवा परंतू डोकं शांत ठेवा असं जितेंद्र आव्हाड यावेळी बोलताना सांगितलं.

Previous Post
संजय राऊत आणि खासदार सुप्रिया सुळे यांचा भन्नाट डान्स

संजय राऊत आणि खासदार सुप्रिया सुळे यांचा भन्नाट डान्स

Next Post
'शेतकरी, कामगार देशोधडीला लागले आणि ठाकरे सरकारचे प्रमुख नेते डान्स करतायत'

‘शेतकरी, कामगार देशोधडीला लागले आणि ठाकरे सरकारचे प्रमुख नेते डान्स करतायत’

Related Posts
Mazi Ladki bahin Yojana | 'सेवानिवृत्त शासकीय कर्मचारी कुटुंबातील महिलांसाठी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण’ योजनेच्या पात्रता निकषांमध्ये बदल करा'

Mazi Ladki bahin Yojana | ‘सेवानिवृत्त शासकीय कर्मचारी कुटुंबातील महिलांसाठी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण’ योजनेच्या पात्रता निकषांमध्ये बदल करा’

चंद्रपूर | सेवानिवृत्त शासकीय कर्मचारी कुटुंबातील महिलांचे जीवन अधिक सुलभ करण्याच्या उद्देशाने ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण’ (Mazi Ladki…
Read More
Dum Aloo Biryani Recipe | हॉटेल सारखी दम आलू बिर्याणी घरी बनवा, फक्त ही रेसिपी फॉलो करा!

Dum Aloo Biryani Recipe | हॉटेल सारखी दम आलू बिर्याणी घरी बनवा, फक्त ही रेसिपी फॉलो करा!

Dum Aloo Biryani Recipe : बिर्याणी खायला कोणाला आवडत नाही? त्याची चव अप्रतिम लागते. अशा परिस्थितीत बिर्याणीचा एक…
Read More