शिवसेनेच्या नेत्याच्या तक्रारीवरून राष्ट्रवादीच्या नेत्याची 500 कोटींच्या घोटाळाप्रकरणी ईडीकडून चौकशी

सोलापूर – गेल्या काही दिवसांपासून भ्रष्टाचार करणाऱ्या नेत्यांच्या मागे केंद्रीय तपास यंत्रणा मागे लागल्या आहेत. राज्यात गेल्या काही दिवसांपासून ईडी सक्रीय झाली असून अनेक नेत्यांचे धाबे दणाणले आहेत. यातच आता आणखी कारवाई सुरु झाली असून राष्ट्रवादीचे आमदार बबनराव शिंदे (Baban Shinde) आणि त्यांचे पुत्र रणजितसिंह शिंदे (Ranjit Singh Shinde) यांची ईडीकडून चौकशी (ED Enquiry) झाली आहे.

साखर कारखान्यातील शेतकऱ्यांच्या नावावर परस्पर कर्ज काढणे. शेतकऱ्यांच्या नावावर उचललेले कर्ज कर्जमाफीत माफ करणे, गिरणी खरेदी यासह विविध विषयात ईडीकडून तीन वेळा चौकशी झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. हे संपूर्ण प्रकरण 500 कोटींच्या घरात आहे. राष्ट्रवादीचे आमदार बबनराव शिंदे हे शरद पवारांचे निकटवर्तीय मानले जातात. आतापर्यंत पिता पुत्राची तीनवेळा चौकशी झाली आहे.

राष्ट्रवादीचे माढ्याचे आमदार बबनराव शिंदे कोणत्याही क्षणी जेलमध्ये जातील

राष्ट्रवादीचे माढ्याचे आमदार बबनराव शिंदे कोणत्याही क्षणी जेलमध्ये जातील. ईडीकडे सामाजिक कार्यकर्ते नागनाथ कदम आणि शिवसेना नेते संजय कोकाटे (sanjay kokate) यांनी तक्रार केली होती. शेतकऱ्यांचा घामाचा पैसा त्यांना परत मिळवून देणार, वेळ प्रसंगी हायकोर्ट, सुप्रीम कोर्टात याविरोधात आवाज उठवणार असं माढ्याचे शिवसेना नेते संजय कोकाटे यांनी म्हटलं आहे. महाविकास आघाडी मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेच्या नेत्यानेच राष्ट्रवादीचे आमदार बबनराव शिंदे यांच्याविरोधात ईडीकडे दिली तक्रार होती.