झुकेगा नहीं साला म्हणत एल्गार पुकारणाऱ्या संजय राऊत यांना इडीचे समन्स; चौकशीला सामोरे जावे लागणार

Mumbai – शिवसेना नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे (Shiv Sena leader and minister Eknath Shinde) यांच्या बंडानंतर राज्यात राजकीय वातावरण तापले आहे. ४० पेक्षा जास्त शिवसेना आमदार आणि इतर अपक्ष आमदारासमवेत एकनाथ शिंदे गुवाहाटीमधल्या हॉटेलमध्ये थांबले आहेत. भाजपासोबत शिवसेनेनं हातमिळवणी करून सरकार स्थापन करावं अशी अट त्यांनी पक्षाला घातली असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी (Chief Minister Uddhav Thackeray) हे कदापि शक्य नसल्याचं स्पष्ट केलं आहे. या सर्व घडामोडींमुळे राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे.

दरम्यान, एका बाजूला हे सर्व सुरु असताना आता खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) यांना इडीचे समन्स आले आहे.(ed-summons-sanjay-raut ) उद्या 11 वाजता चौकशी साठी त्यांना बोलावण्यात आलं आहे. पत्रावाला चाळ जमीन घोटाळा प्रकरणी हे समन्स बजावण्यात आल्याचं सांगितले जात आहे. दरम्यान, अजून अशी नोटीस मिळाली नाही असं राऊत यांच्याकडून सांगण्यात येत आहे.

दरम्यान, दरम्यान उद्या संजय राऊत यांचा पूर्वनियोजित कार्यक्रम आहे. त्यामुळे ते उद्या चौकशीसाठी ईडी कार्यालयात जाण्याची शक्यता कमीच आहे. चौकशीसाठी हजर राहण्यासाठी ते ईडीकडे मुदत मागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या सर्व घडामोडींमुळे राज्यातील राजकारणात आणखी संघर्ष वाढणार असं दिसतंय.