शिवसेनेच्या ढाण्या वाघाच्या अडचणीत वाढ, ईडीचं पथक संजय राऊतांच्या घरी दाखल

मुंबई – पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी ईडीने(ED) शिवसेना नेते संजय राऊत(sanjay Raut) यांच्या आता अडचणी वाढल्या आहेत. पत्राचाळ जमीन घोटाळ्याप्रकरणी (Patra Chaal Land Scams) सक्तवसुली संचालनालयाचं (ED) पथक रविवारी (३१ जुलै) सकाळी ७ वाजता संजय राऊत यांच्या मुंबई येथील घरी दाखल झालं. आज दिवसभरात राऊतांची पुन्हा चौकशी होईल. यात त्यांना पत्राचाळ जमीन घोटाळ्याशी संबंधित अनेक प्रश्न विचारले जातील. याशिवाय घराची झडतीही घेतली जाण्याची शक्यता आहे.

ईडीच्या एकूण तीन पथकांकडून कारवाई होत आहे. दरम्यान, या प्रकरणी ईडीने आधीही संजय राऊत यांच्या अलिबागमधील ८ प्लॉट आणि मुंबईतील एका फ्लॅटवर जप्तीची कारवाई केली होती. दरम्यान, अडीच वर्षांपूर्वी राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर शिवसेनेच्या नेत्यांवर भाजपकडून सातत्याने आरोप करण्यात आले होते. त्यानंतर दाखल झालेल्या तक्रारीनुसार, शिवसेनेचे बडे नेते ईडीच्या रडारवर आले होते.