पुण्यामध्ये पुनश्च एकवार नॅशनल गेम्सचे आयोजन होण्यासाठी प्रयत्न करणार – MP Mohol

पुण्यामध्ये पुनश्च एकवार नॅशनल गेम्सचे आयोजन होण्यासाठी प्रयत्न करणार - MP Mohol

MP Mohol | महाराष्ट्रात आणि पुण्यामध्ये पुनश्च एकवार नॅशनल गेम्सचे आयोजन व्हायला हवे आणि त्यासाठी आपण प्रयत्न करूया असे प्रतिपादन केंद्रीय राज्यमंत्री नामदार मुरलीधर मोहोळ (MP Mohol) यांनी केले. बालेवाडी येथील छत्रपती क्रीडा संकुल येथे आयोजित सब ज्युनिअर राष्ट्रीय स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.

ते पुढे म्हणाले की, ज्यूदो हा खेळ माझ्या आवडत्या कुस्ती खेळाशी खूप साम्य असून यातील डावही कुस्तीमध्ये वापरले जातात त्यामुळे ज्यूदो आणि कुस्ती हे युद्धकलेचे खेळ, भाऊभाऊच आहेत. स्पर्धेचे उद्घाटन दीपप्रज्वलनाने करण्यात आले.

प्रसिद्ध उद्योजक पुनीत बालन यांची या कार्यक्रमास विशेष उपस्थिती होती. यावेळी पुनीत बालन यांनी स्पर्धेतील सहभागी पदक विजेत्यांसाठी रोख दहा लाख रुपयांची बक्षिसांची घोषणा केली, यामध्ये सुवर्णपदक विजेत्यास 11,000 रुपये, रोप्य पदक विजेत्यास 7000 रुपये तर दोन्ही कांस्यपदक विजेत्यास पाच हजार प्रत्येकी असे बक्षीस जाहीर केले.

यावेळी व्यासपीठावर इन्स्पायर इन्स्टिट्यूट ऑफ स्पोर्ट्सचे तथागत मुखर्जी आणि ज्यूदो फेडरेशनचे पदाधिकारी वीरेंद्र वशिष्ठ, सी एस राजन यांसह द्रोणाचार्य पुरस्कार प्राप्त जीवन शर्मा, अर्जुन पुरस्कार प्राप्त यशपाल सोलंकी, राज्य ज्यूदो संघटनेचे अध्यक्ष धनंजय भोसले यांसह इतर पदाधिकारी उपस्थित होते.

समारंभास पॅरिस येथील ऑलिम्पिक स्पर्धेत रौप्य पदक विजेता अर्जुन पुरस्कार प्राप्त सचिन खिलारे यांना विशेष आमंत्रित केले होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक राज्य ज्यूदो संघटनेचे महासचिव शैलेश टिळक यांनी तर आभार प्रदर्शन तांत्रिक सचिव दत्ता आफळे यांनी केले.

स्पर्धेसाठी सबज्युनियर गटामध्ये 29 राज्यातील 235 मुले आणि 230 मुली खेळाडू सहभागी झाले आहेत.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

पालकमंत्र्यांची यादी जाहीर, कोणत्या मंत्र्याकडे कोणता जिल्हा? पहा संपूर्ण यादी

धनंजय मुंडे यांना मोठा धक्का; अजित पवार यांच्याकडे बीड जिल्ह्यांचे पालकमंत्रिपद

निवडणुकीच्या प्रचारादरम्यान केजरीवाल यांच्या गाडीवर दगडफेक, आपचा भाजपवर आरोप

Previous Post
शिक्षण विभागाकरीता आखण्यात आलेल्या १० कलमी कार्यक्रमाची प्रभावीपणे अंमलबजावणी करा- Dada Bhuse

शिक्षण विभागाकरीता आखण्यात आलेल्या १० कलमी कार्यक्रमाची प्रभावीपणे अंमलबजावणी करा- Dada Bhuse

Next Post
'हे' 3 भारतीय 2023 विश्वचषकानंतर प्रथमच वनडे खेळणार 

‘हे’ 3 भारतीय 2023 विश्वचषकानंतर प्रथमच वनडे खेळणार 

Related Posts
Narendra Modi | नैराश्याने ग्रासलेल्या काँग्रेसने देशाला पाच दशके मागे ढकलले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा घणाघात

Narendra Modi | नैराश्याने ग्रासलेल्या काँग्रेसने देशाला पाच दशके मागे ढकलले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा घणाघात

Narendra Modi  | स्वातंत्र्य मिळाल्यावर काँग्रेस विसर्जित करावी असा सल्ला महात्मा गांधींनी दिला होता. त्यानुसार काँग्रेस विसर्जित झाली…
Read More
शॉपिंग अँड फूड फेस्टिवल

पुण्यात विंटर शॉपिंग अँड फूड फेस्टिवलचे आयोजन, खाद्य-खरेदी धम्माल

पुणे: हिवाळा म्हटला की वर्षभर जी गोष्ट कपाटाच्या ठेवली असते ती बाहेर निघते ते म्हणजे स्वेटर आणि मफलर.…
Read More
Gokhale Institute | गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पुणे मधील अकॅडमीक बिल्डिंगमध्ये देशविरोधी पोस्टरवर पेंटींग करणारे नक्की कोण?

Gokhale Institute | गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पुणे मधील अकॅडमीक बिल्डिंगमध्ये देशविरोधी पोस्टरवर पेंटींग करणारे नक्की कोण?

पुण्यातील नामवंत इन्स्टिट्यूट गोखले इन्स्टिट्यूट (Gokhale Institute) ऑफ पुणे येथील अकॅडमी बिल्डिंग मध्ये गेल्या काही दिवसांपासून लावलेल्या इलेक्शन…
Read More