राष्ट्रवादीला मोठा धक्का; एकनाथ खडसे घरवापसी करण्याच्या तयारीत ?

जळगाव – भाजपमधून (BJP) नुकतेच राष्ट्रवादीत (NCP) गेलेले ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) पुन्हा भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चा रंगू लागल्यात. त्यातच, खडसेंच्या सुनबाई आणि भाजप खासदार रक्षा खडसेंनी केलेल्या एका विधानाचीही चर्चा होत आहे. एकनाथ खडसेंची अमित शाहांसोबत फोनवरुन चर्चा झाल्याचं रक्षा खडसेंनी (Raksha Khadse) माध्यमांना सांगितलं. मात्र, या चर्चेमागचं कारण न सांगितल्याने निश्चितच खडसे-शाहांमधील चर्चेबाबतचा सस्पेन्स वाढला आहे.

खडसेंच्या सून आणि भाजपच्या खासदार रक्षा खडसे (MP Raksha Khadse) यांच्यासोबत एकनाथ खडसे हे दिल्लीत अमित शहा यांच्या भेटीला गेले होते. पण, अमित शहा यांचं व्यस्त शेड्युल असल्यामुळे भेट होऊ शकली नाही. मात्र एकनाथ खडसे यांची फोनवरुन अमित शहा यांच्यासोबत चर्चा झाली आहे अशी माहिती खुद्द भाजपच्या खासदार रक्षा खडसे यांनी आज पत्रकारांशी बोलतांना दिली. अमित शाहांच्या भेटीसाठी खडसे सासरे-सून दिल्लीला शाहांच्या व्यस्ततेमुळे भेट टळली. मात्र फोनवर चर्चा झाल्याचं भाजप रक्षा खडसेंनी सांगितलं.