राजू शेट्टी यांचा अत्यंत जवळचा ‘हा’ झुंजार नेता राष्ट्रवादीत प्रवेश करणार?

बुलढाणा – बुलढाण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथ खडसे (Eknath Khadse) आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तरुण नेते रविकांत तुपकर (Ravikant Tupkar) यांची भेट झाल्याची माहिती समोर येत आहे. तसेच एकनाथ खडसे आणि रविकांत तुपकर यांच्यात एक तास बंद दाराआड चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे बुलढाण्यात विविध चर्चांना उधाण आलं आहे.

राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे हे आज बुलढाणा येथे जिल्हाधिकाऱ्यांच्या भेटीसाठी आले होते. या दरम्यान त्यांनी स्वाभिमानीचे नेते रविकांत तुपकर यांच्या कार्यालयाला भेट दिली. यावेळी रविकांत तुपकर आणि एकनाथ खडसे यांच्यात जवळपास एक तास बंद दाराआड चर्चा झाली. त्यामुळे स्वाभिमानीचे नेते रविकांत तुपकर हे राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याची चर्चा बुलढाण्यात रंगू लागली आहे.