वर्षानुवर्षाची पुण्याई दोघांच्या भांडणात गोठवली गेली,यापेक्षा दुर्दैवी प्रसंग नसावा – खडसे

Mumbai – शिवसेनेचे ‘धनुष्य-बाण’ हे निवडणूक चिन्ह(sign) गोठवण्याचा हंगामी आदेश केंद्रीय निवडणूक आयोगाने शनिवारी रात्री उशिरा जारी केला.आयोगाचा हा निर्णय ठाकरे गटासाठी धक्कादायक असून त्याविरोधात न्यायालयात दाद मागितली जाण्याची शक्यता आहे. न्यायालयाच्या या निर्णयामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ माजली आहे. कालपासून विविध नेत्यांच्या प्रतिक्रियाही समोर येत आहेत.

या पार्श्वभूमीवर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी शिंदे गटासोबतच शिवसेनेलाही सुनावलं आहे. तसेच, राज्यात गेल्या ३०-४० वर्षांत अशा घडामोडी कधीही पाहिल्या नाहीत, असंही ते म्हणाले.आयुष्यभर सरसेनापती बाळासाहेब ठाकरेंनी मेहनत केली. धनुष्यबाणाला प्रतिष्ठा प्राप्त करून दिली. या धनुष्यबाणाच्या जोरावर महाराष्ट्रात सत्ता काबीज केली. राज्यात शिवसेनेचे मुख्यमंत्री झाले. पण ही वर्षानुवर्षाची पुण्याई दोघांच्या भांडणात गोठवली गेली. यापेक्षा दुर्दैवी प्रसंग नसावा”, अशा शब्दांत एकनाथ खडसेंनी प्रतिक्रिया दिली.

शरद पवार हे बर्मुडा ट्रँगल आहे असं म्हणण्यापेक्षा त्यांनी अनेक माणसं मोठी केली त्यांच्यामुळेच उद्धवजी ठाकरे या राज्याचे मुख्यमंत्री होऊ शकले. शरद पवार यांच्यावर आरोप करणे म्हणजे एक मूर्खपणा आहे असा टोला राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी शिंदे गटातील नेते विजय शिवतारे यांना लगावला आहे.