एकनाथ शिंदेकडून सेनेची नवी राष्ट्रीय कार्यकारणी जाहीर, पहा कोणत्या नेत्याकडे असणार कोणती जबाबदारी 

मुंबई : मुख्यमंत्री  एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडानंतर शिवसेनेत मोठी फुट पडली आहे. यात मोठा पाठींबा हा शिंदे गटाला मिळत असून अनेक नेते शिंदे गटात सामील होत आहेत. यातच आता शिंदे  गटाने शिवसेनेची नवी राष्ट्रीय कार्यकारणी जाहीर केल्याची मोठी बातमी समोर आली आहे. विशेष म्हणजे स्वत: एकनाथ शिंदेंनीच शिवसेनेची जुनी राष्ट्रीय कार्यकारणी बरखास्त केली आहे.

यावेळी शिवसेना मुख्य नेते म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची निवडही करण्यात आली आहे. आमदार दीपक केसरकर यांची प्रवक्तेपदी निवड करण्यात आली असून नेतेपदी रामदास कदम आणि आनंदराव अडसूळ यांची निवड केली आहे. याशिवाय उपनेतेपदी यशवंत जाधव, गुलाबराव पाटील, उदय सामंत, शरद पोंक्षे, तानाजी सावंत, विजय नहाटा, शिवाजीराव आढळराव पाटील यांची नेमणूक करण्यात आली आहे.

अद्याप तरी त्यांनी शिवसेना पक्षप्रमुखपदाला हात लावलेला नाही. मात्र आमदारांचा विषय न्यायप्रविष्ठ असतानाही एकनाथ शिंदेंनी नवी राष्ट्रीय कार्यकारणी जाहीर केल्यामुळे ठाकरे गटाकडून टीका केली जात आहे.