Eknath Shinde | काँग्रेसवाले भाकरी भारताची खातात आणि चाकरी पाकिस्तानची करतात, मुख्यमंत्र्यांचा हल्लाबोल

Eknath Shinde | काँग्रेस पाकिस्तानची भाषा बोलत आहे. भाकरी भारताची खातात आणि चाकरी पाकिस्तानची करतात. शहिदांचा अपमान करणे आणि कसाबची बाजू घेणे हा काँग्रेसचा देशद्रोहीपणा आहे. बाळासाहेबांचा वारसा सांगणाऱ्या उबाठांना काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसताना मनाची नाही तर जनाची लाज वाटायला हवी होती, अशी घणाघाती टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी केली.

पालघर लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार डॉ. हेमंत सावरा यांच्या प्रचारासाठी वसईत आयोजित करण्यात आलेल्या जाहीर सभेत मुख्यमंत्री बोलत होते. तीन वर्षांपूर्वी पालघरमध्ये साधू हत्याकांड झाले होते. त्या खटल्यात महाविकास आघाडी सरकारने आरोपींना पाठिशी घालून न्याय दिला नाही. मात्र महायुतीचे सरकार आल्यानंतर एकाही साधू संतांना हात लावण्याची हिम्मत कोणी करू शकणार नाही, असे काम सरकारने केल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

यावेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, काश्मीरमध्ये कलम ३७० हटवले तेव्हा राहून गांधी यांनी रक्ताचे पाट वाहतील असे म्हटले होते. मात्र गृहमंत्री अमित शहा यांनी राहुल गांधी आणि दहशतवादाची बोलती बंद करून टाकली. काश्मिर मोकळा श्वास घेत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आणि गृहमंत्री अमित शाह यांच्या सहकार्यामुळे लाल चौकात तिरंगा फडकला आहे.

अयोध्येमध्ये राम मंदिरांचे 500 वर्षांपासूनचे भारतीयांचे स्वप्न होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हे स्वप्न पूर्ण केले. त्यामुळे आपण जय श्रीराम बोलतो. पण विरोधकांना याची पोटदुखी झाली असल्याची टीका मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

You May Also Like