एकनाथ शिंदे यांचे राज्यभरात तब्बल २० हून अधिक आमदार ? ठाकरे सरकारसाठी धोक्याची घंटा

मुंबई – विधान परिषदेच्या निकालाने (Result of the Legislative Council) महाविकास आघाडीला (MVA) झटका बसला असून, शिवसेनेतील (Shivsena) महत्त्वाचे नेते आणि सध्या कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे नाराज (Eknath Shinde got angry) असल्याचे वृत्त आहे. शिंदे हे सध्या गुजरातमध्ये (Eknath Shinde in Gujarat) गेले आहेत. सध्या ते सुरतमधील ली मेरिडिअन या हॉटेलमध्ये आहेत अशी माहिती समोर येत आहे.

गेले काही वर्ष नाराज असलेले शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे आणि त्याच्या गटाचे आमदार यांनी टोकाचं पाऊल उचललं आहे अशी माहिती समोर येत आहे. एकनाथ शिंदे हे पुन्हा पक्षासोबत येतील, असा विश्वास शिवसेना नेत्यांकडून व्यक्त करण्यात येत असला तरी शिंदे यांनी थेट भाजप नेत्यांसोबत चर्चा केल्याने आगामी काळात राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या स्थैर्यावर त्याचा मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. राज्यभरात एकनाथ शिंदे यांचे तब्बल २० हून अधिक आमदार असल्याची माहिती आहे. त्यामुळे ठाकरे सरकारसाठी ही धोक्याची घंटा समजली जात आहे.