एकनाथ शिंदे आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा देण्याची शक्यता

मुंबई – विधान परिषदेच्या निकालाने (Result of the Legislative Council) महाविकास आघाडीला (MVA) झटका बसला असून, शिवसेनेतील (Shivsena) महत्त्वाचे नेते आणि सध्या कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे नाराज असल्याचे वृत्त आहे. शिंदे हे सध्या गुजरातमध्ये (Eknath Shinde in Gujarat) गेले आहेत. सध्या ते सुरतमधील ली मेरिडिअन या हॉटेलमध्ये आहेत अशी माहिती समोर येत आहे.

राज्यात राजकीय भूकंप (Political earthquake) घडवणाऱ्या शिवसेनेतील आजवरच्या सर्वात मोठ्या बंडानं ठाकरे सरकार (Thackeray government) अडचणीत आलं आहे. याचवेळी एकनाथ शिंदे यांच्यासोबत 35 आमदार असल्याची चर्चा आहे. या आमदारांची भूमिकाही आता समोर आली असून त्यांना काँग्रेस-राष्ट्रवादीबरोबरचं सरकार अमान्य असल्याचं कळत आहे भाजप (BJP) बरोबर गेल्यास आम्ही अजूनही शिवसेनेसोबत असल्याची भूमिका बंडखोर आमदारांनी घेतल्याची माहिती मिळत आहे. आम्ही शिवसैनिक आहोत आणि अजूनही शिवसेनेसोबतच आहोत, अशी भूमिका बंडखोर आमदारांनी घेतल्याची माहिती मिळत आहे.

यादरम्यान शिवसेनेविरोधात बंड केलेले एकनाथ शिंदे आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा (The minister resigns) देणार असल्याची माहिती आहे. आज संध्याकाळी ते आपल्या पदाचा राजीनामा देणार असल्याची माहिती आहे. एकनाथ शिंदेंच्या बंडाच्या पार्श्वभूमीवर आज संध्याकाळी सहा वाजता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Chief Minister Uddhav Thackeray and Deputy Chief Minister Ajit Pawar) यांची बैठक होणार आहे. अशी देखील माहिती समोर येत आहे.