एकनाथ शिंदे साहेबांनी शिवसेनेत आणले, आता…; दीपाली सय्यदांसमोर मोठा पेचप्रसंग

मुंबई – महाराष्ट्रात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या महाविकास आघाडी सरकारवर (MVA) राजकीय संकटाचे ढग दाटले आहेत. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde)  बंडखोर झाल्याने उद्धव ठाकरे सरकार संकटात सापडले आहे. शिंदे यांची बंडखोर वृत्ती पाहता शिवसेनेने त्यांना विधिमंडळ पक्षनेतेपदावरून हटवले असले तरी या निर्णयांमुळे एकनाथ शिंदे हे कोणत्याही दबावाखाली दिसत नाहीत.

उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचं सरकार संकटात आल्यावर आता त्यांच्यावर चौफेर टीका होत असल्याचं दिसून येत आहे. इतकं मोठं बंड झाल्यावर त्यांनी सत्ता सोडायला हवी अशीही चर्चा सुरू आहे. यातच आता शिवसेना नेत्या आणि अभिनेत्री दीपाली सय्यद (deepali sayed) यांचं ट्विट सध्या चर्चेत आहे.

‘सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब मला शिवसेनेत (Shivsena) घेऊन आले. माननीय उद्धवसाहेब ठाकरे साहेबांनी मला शिवसेनेत वावरायला शिकवले. दोन्ही बाजू गुरूचरणी, विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती ? आमची निष्ठा प्रतिष्ठा शिवसेनेच्या चरणी भविष्यात जे होईल त्याचा स्विकार करू,’ असं दीपाली सय्यद यांनी म्हटलं आहे.