Eknath Shinde | मुंबईकडे वाकड्या नजरेने पाहिले तर नरेंद्र मोदी (Narendra Modi) घरात घुसुन मारतील, याचा धसका पाकिस्तानने घेतला आहे. मागील १० वर्षात देशात एकही बॉम्बस्फोट झाला नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देश मजबूत केला. आज बाळासाहेब ठाकरे असते तर ते बोलले असते मोदी गया तो देश गया, त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींशिवाय भारताला पर्याय नाही, असे गौरवौद्गार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी काढले. मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या महायुतीच्या जाहीर सभेत ते बोलत होते.
या सभेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह मनसे अध्यक्ष राज ठाकरे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, रिपब्लिकन पक्षाचे प्रमुख रामदास आठवले आदी उपस्थित होते.
महाराष्ट्र का काम, मोदीजी का नाम आणि अयोध्या का राम मागील १० वर्षात त्यांनी एकही सुट्टी घेतली नाही. काहीजणांना पंतप्रधान बनण्याची स्वप्ने पडली आहेत पण घरात बसून देश चालवणार का अशी खरमरीत टीका त्यांनी उबाठावर केली. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देश सुरक्षित ठेवला, गरिबांचे कल्याण केले. भ्रष्टाचार रोखला, अर्थव्यवस्था पाचव्या क्रमांकावर आणली, लाभार्थींचे पैसे जनधन खात्यात दिले, ८० कोटी जनतेला मोफत रेशन, पाच लाखांचा आरोग्य विमा, महिलांना आत्मनिर्भर केले, बेरोजगारांच्या हाताला काम केले आणि देशाला महासत्तेकडे घेऊन जाणाऱ्या मोदीजींना मत देणार असे प्रत्येक भारतीय मतदार बोलत आहे. महाराष्ट्र का काम, मोदीजी का नाम आणि अयोध्या का राम असे मुख्यमंत्री म्हणाले.
आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअॅप ग्रुप
महत्वाच्या बातम्या :