शिंदेशाहीला सुरुवात : मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेंनी तर फडणवीसांनी उपमुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

मुंबई – उद्धव ठाकरे यांनी आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर राज्याच्या नेतृत्वाची धुरा कोण सांभाळणार याची सर्वांनाच उत्सुकता लागली होती. मुख्यमंत्रीपदी भाजपाचे नेते देवेंद्र फडणवीस तर उपमुख्यमंत्रीपदी शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे हे असतील असे अंदाज बांधले जात होते. मात्र हे सर्व तर्क फोल ठरवत देवेंद्र फडणवीस यांनी सर्वांनाच आश्चर्यचकित केलं आहे. त्यांनी राज्याचे नवे मुख्यमंत्री हे एकनाथ शिंदे असतील, असं जाहीर केलं.

दरम्यान, आता मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांनी तर उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली आहे.आधी फडणवीस यांनी मी सत्तेत सहभागी होणार नसल्याचे म्हटले होते मात्र त्याना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दोनदा फोन केला. नरेंद्र मोदींच्या आग्रहानंतर फडणवीसांना शिंदे सरकारमध्ये सहभागी होण्याची निर्णय घेतला.

भाजपाने आम्हाला साथ दिली. संख्याबळ असूनही त्यांनी मुख्यमंत्री पदावर दावा केला नाही. तर बाळासाहेबांच्या विचाराने चालणाऱ्या व्यक्तीला मुख्यमंत्री पद दिलं. हा देवेंद्र फडणवीसांच्या मनाचा मोठेपणा आहे. मी त्यांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही.असेही एकनाथ शिंदे म्हणाले.