Eknath Shinde | “रंग बदलणारे सरडे पाहिले, मात्र इतक्या…”, उद्धव ठाकरेंबाबत मुख्यमंत्री शिंदे काय म्हणाले?

Eknath Shinde | मुंबईतील सहा लोकसभा मतदारसंघांचे मतदान पाचव्या टप्प्यात अर्थात २० मे रोजी पार पडणार आहे. तत्पूर्वी महायुतीची भव्य सभा शिवाजी पार्कवर पार पडली. या सभेला पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्यासह मनसे अध्यक्ष राज ठाकरे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, आदी उपस्थित होते. यावेळी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी उद्धव ठाकरेंवर जहरी टीका केली.

आपल्या भाषणात एकनाथ शिंदे म्हणाले, उबाठाला हिंदू म्हणवून घ्यायची लाज वाटत आहे. हिंदूहृदयसम्राट म्हणायला जीभ कचरू लागली आहे. रंग बदलणारे सरडे पाहिले, मात्र इतक्या जलद गतीने रंग बदलणारा सरडा कधी पाहिला नाही. काँग्रेसमध्ये उबाठा लोळतायेत. बिघडणारं पोरगं चुकीच्या वाटेला लागलेलं असं आपण म्हणतो. त्यात हे म्हणतात माझा बाप चोरला, अरे हे काय खेळणं आहे का? आम्हाला फक्त बाळासाहेबांचे विचार हवेत, तीच आमची संपत्ती आहे, असा घणाणात यावेळी मुख्यमंत्र्यांनी केला.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

You May Also Like