Eknath Shinde | लोकसभा निवडणुकीत संविधान बदलणार, आरक्षण बंद होणार, असे फेक नरेटिव्ह पसरवून विरोधी पक्षांनी समाजाला संभ्रमित करण्याचा प्रयत्न केला. मात्र जोवर चंद्र सूर्य आहेत तोवर डॉ. बाबासाहेबांचे संविधान बदलणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. दलित पँथर संघटनेच्या ५२ वा वर्धापन दिन सोहळ्यात ते बोलत होते. शिवशक्ती-भीमशक्ती एकत्र आणण्याचे काम हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि नामदेव ढसाळ यांनी केले. मैत्रिचा हा वारसा आपण पुढे नेऊ, असे मुख्यमंत्री म्हणाले.
बाळासाहेब आणि ढसाळ या दोघांचा स्वभाव परखडपणे बोलण्याचा होता. एकदा बोलले की परत मागे घ्यायचे असा विषय दोघांच्याही डिक्शनरीत नव्हता. आक्रमक आणि समाजावर प्रभाव टाकणारे नेते अशी दोघांची ओळख होती, असे ते म्हणाले. नामेदव ढसाळांनी दलित समाजाच्या वेदना, व्यथा त्यांच्या कवितांमधून आक्रमकपणे मांडल्या. त्यांच्या कवितांनी साहित्य जगताचे लक्ष वेधून घेतले होते, असे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.
मुख्यमंत्री (Eknath Shinde) पुढे म्हणाले की, देशाचा कारभार हा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी तयार केलेल्या घटनेवर चालतो. ही राज्यघटना जगातील सर्वोत्तम राज्यघटना म्हणून गणली जाते. या घटनेत सर्व सामान्य, वंचित, शोषिताला न्याय मिळायला पाहिजे, अशी तरतूद केली आहे. केंद्र सरकारने संविधान दिन २०१५ मध्ये सुरु केला. लंडनमधील ड़ॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे घर स्मारक केले. इंदु मिलमध्ये जगाला हेवा वाटेल, असे डॉ. बाबासाहेबांचे भव्यदिव्य स्मारक राज्य सरकार उभारत आहे. सामाजिक न्याय विभागाकडून दलित समाजातील सर्व घटकांना न्याय देण्याचे काम करतोय, असे मुख्यमंत्री म्हणाले. न मागता काम करणाऱ्या लोकांना सरकार देते, असे ते म्हणाले.
आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअॅप ग्रुप
महत्वाच्या बातम्या :