निवडणूक निरीक्षकांची माध्यम कक्षाला भेट

निवडणूक निरीक्षकांची माध्यम कक्षाला भेट

पुणे |  पुणे जिल्हयातील विधानसभा मतदारसंघासाठी भारत निवडणूक आयोगाने नियुक्त (Election Inspector) केलेल्या निवडणूक निरीक्षकांनी जिल्हाधिकारी कार्यालयात स्थापन करण्यात आलेल्या माध्यम कक्षाला भेट देऊन तेथील कामकाजाचा आढावा घेतला. निवडणूक निरीक्षक मानवेश सिंह सिद्धू, ललीत कुमार, भीम सिंह, पीगे लिगू, अरुंधती सरकार, नाझीम झई खान, गार्गी जैन, एम गौतमी, संजीव कुमार, के हिमावती, ए वेंकादेश बाबू, उमेश कुमार, प्रेम प्रकाश मीना, सुमीत कुमार आणि अमीत कुमार या भेटीत सहभागी झाले होते.

जिल्हाधिकारी डॉ.सुहास दिवसे, निवडणूक उपजिल्हाधिकारी मिनल कळसकर, जिल्हा माहिती अधिकारी तथा माध्यम कक्ष समन्वयक डॉ.रविंद्र ठाकूर, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठाचे सहायक प्राध्यापक योगेश बोराटे,सहायक संचालक जयंत कर्पे यावेळी उपस्थित होते.

प्रिंट, इलेक्ट्रॉनिक आणि समाज माध्यमावरील बातम्या, जाहिराती आणि पेड न्यूजबाबत कक्षातर्फे करण्यात येणाऱ्या कार्यवाहीची माहिती निरीक्षकांनी घेतली. जिल्हाधिकारी डॉ.सुहास दिवसे यांनी माध्यम कक्षाच्या कामकाजाविषयी माहिती दिली.

जिल्हा माहिती अधिकारी तथा माध्यम कक्ष समन्वय अधिकारी डॉ. रवींद्र ठाकूर, सहायक संचालक जयंत कर्पे यांनी माध्यम कक्षातर्फे तयार करण्यात येणाऱ्या विविध अहवालांची माहिती दिली. प्रा.बोराटे यांनी समाज माध्यमावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहिराती, पेड न्यूज व त्यावर केलेली कार्यवाही याबद्दल माहिती दिली.

माध्यम कक्षात सुमारे १० दूरचित्रवाणी संचांच्या माध्यमातून वृत्तवाहिन्यांतील निवडणूक (Election Inspector) प्रचार, जाहिरात, पेड न्यूज आदींच्या अनुषंगाने संनियंत्रण केले जात आहे. तसेच सोशल मीडियावरील पोस्टबाबतही बारकाईने संनियंत्रण केले जात आहे. वृत्तपत्रातील जाहिराती आणि पेड न्यूजबाबतही दररोजच्या वृत्तपत्रांचे अवलोकन केले जात असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

अरविंद सावंत यांच्या अडचणी वाढणार? नीलम गोऱ्हे यांची थेट निवडणूक आयोगात तक्रार

अर्जुन खोतकर देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला; पहा नेमकं कारण काय ?

‘..म्हणून राज ठाकरेंनी मुख्यमंत्री व्हावे’, असे का बोलले शिवसेना उबाठा नेते संजय राऊत?

Previous Post
दिवाळीच्या झगमगाटात तुम्हाला झोप येत नसेल तर या टिप्सची मदत घ्या!

दिवाळीच्या झगमगाटात तुम्हाला झोप येत नसेल तर या टिप्सची मदत घ्या!

Next Post
विधानसभेपूर्वी फडणवीस यांची सुरक्षा वाढवली, 'फोर्स वन'चे जवान सावलीसारखे राहतील, जाणून घ्या कारण?

विधानसभेपूर्वी फडणवीस यांची सुरक्षा वाढवली, ‘फोर्स वन’चे जवान सावलीसारखे राहतील, जाणून घ्या कारण?

Related Posts
संजय शिंदे - संजय राऊत

आम्हाला ज्या पद्धतीने सांगण्यात आले होते, त्यानुसारच मतदान केले – संजय शिंदे

मुंबई :  राज्यसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे (MVA) तीन उमेदवार विजयी झाले आहे. तर भाजपचे तीन उमेदवार विजयी झाले…
Read More
दहीहंडी

मुंबई भाजपाकडून गोविंदांना १० लाखाचे विमा कवच

मुंबई: दहीहंडीचे मानवी मनोरे रचताना अपघात होवू नये अशी अपेक्षा असते. मात्र, काहीवेळा अपघाताने थरावरचे गोविंदा खाली पडून…
Read More
दिल्लीतील अदृश्य शक्तीकडून केंद्रीय तपास यंत्रणाचा दुरूपयोग; सुप्रिया सुळेंचे टीकास्त्र

दिल्लीतील अदृश्य शक्तीकडून केंद्रीय तपास यंत्रणाचा दुरूपयोग; सुप्रिया सुळेंचे टीकास्त्र

Supriya Sule | एका लोकशाहीमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानाच्या मार्फत पारदर्शक निवडणूक व्हावी यासाठी आमचा प्रयत्न…
Read More