Dhairyasheel Mane | शिवसेना संसदीय पक्षाच्या उपनेते पदी खासदार धैर्यशील माने यांची निवड

Dhairyasheel Mane | शिवसेना संसदीय पक्षाच्या उपनेते पदी खासदार धैर्यशील माने यांची निवड

लोकसभेतील शिवसेना संसदीय पक्षाच्या उपनेतेपदी खासदार धैर्यशील माने (Dhairyasheel Mane) यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. धैर्यशील माने हे महाराष्ट्रातील हातकणंगले मतदार संघातून सलग दुसऱ्यांदा खासदार म्हणून निवडून आले आहेत. माने यांच्या निवडीचे पत्र शिवसेना पक्षाचे प्रमुख नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लोकसभा अध्यक्षांकडे सादर केले.

शिवसेना पक्षाने लोकसभेची जबाबदारी युवा खासदारांवर सोपवलेली आहे. नुकताच कल्याणचे खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांची शिवसेना पक्षाच्या लोकसभेतील गटनेतेपदी निवड करण्यात आली होती. आता शिवसेना संसदीय पक्षाच्या उपनेतेपदी खासदार धैर्यशील माने (Dhairyasheel Mane) यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. तरुण आणि अभ्यासू खासदार म्हणून धैर्यशील माने यांची ओळख आहे. नुकताच धैर्यशील माने यांनी अर्थसंकल्पावरील भाषणात विरोधकांचा कठोर शब्दांत समाचार घेतला होता.

लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातून शिवसेनेचे ७ खासदार निवडून आले असून शिवसेनेने केंद्रातील राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारला पाठिंबा दिला आहे.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

Previous Post
Mazi Ladki Bahin Yojana | मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेत नोंदणीचा नवा विक्रम. अवघ्या २५ दिवसांत १ कोटी ८० लाख अर्ज दाखल

Mazi Ladki Bahin Yojana | मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेत नोंदणीचा नवा विक्रम. अवघ्या २५ दिवसांत १ कोटी ८० लाख अर्ज दाखल

Next Post
Sangita Thombre | "२०१९ ला ताईंच्या सांगण्यावरून थांबले आता...", संगिता ठोंबरेंनी दाखवली विधानसभा लढवण्याची तयारी

Sangita Thombre | “२०१९ ला ताईंच्या सांगण्यावरून थांबले आता…”, संगिता ठोंबरेंनी दाखवली विधानसभा लढवण्याची तयारी

Related Posts
औरंगजेब हा काही हिंदूद्वेष्टा नव्हता; जितेंद्र आव्हाडांनी पुन्हा ओकली गरळ

औरंगजेब हा काही हिंदूद्वेष्टा नव्हता; जितेंद्र आव्हाडांनी पुन्हा ओकली गरळ

ठाणे – छत्रपती संभाजी महाराज यांच्याबाबत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आक्षेपार्ह विधान केलं. त्यावर भाजप राज्यात आक्रमक…
Read More
केंद्रीय अर्थसंकल्पातून विकसित भारताची पायाभरणी, देशाला आर्थिक महासत्तेच्या वाटेवर नेणारा अर्थसंकल्प

केंद्रीय अर्थसंकल्पातून विकसित भारताची पायाभरणी, देशाला आर्थिक महासत्तेच्या वाटेवर नेणारा अर्थसंकल्प

Ajit Pawar | “केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पात बारा लाख रुपयांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त करुन मध्यमवर्गीय देशवासियांना मोठी…
Read More
Praniti Shinde | 'सोलापूरची लेक तुमचं स्वागत करते!' म्हणत सातपुतेंच्या उमेदवारीवरून प्रणिती शिंदेंनी लगावला टोला

Praniti Shinde | ‘सोलापूरची लेक तुमचं स्वागत करते!’ म्हणत सातपुतेंच्या उमेदवारीवरून प्रणिती शिंदेंनी लगावला टोला

Praniti Shinde | सोलापूर लोकसभेसाठी भाजपकडून माळशिरसचे आमदार राम सातपुते (Ram Satpute) यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. त्यावर…
Read More