राज्यातील 14 महापालिका आणि 26 जिल्हा परिषदांच्या निवडणुका लागण्याची शक्यता

मुंबई – उत्तर प्रदेशासह पंजाब, उत्तराखंड, गोवा, मणिपूर या राज्यातील निवडणुकांचे बिगुल वाजले आहे. नुकतीच निवडणूक आयोगाने याबाबत घोषणा केली आहे. कॉंग्रेस भाजपसह अन्य पक्षांची प्रतिष्ठा या निवडणुकीच्या निमित्ताने पणाला लागली आहे.

दरम्यान, एका बाजूला निवडणूक आयोगाने स्वतः कोरोना काळात या निवडणुकांची घोषणा केल्याने आता राज्यात रखडलेल्या 14 महापालिका आणि 26 जिल्हा परिषदांच्या निवडणुकांची लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. 17 जानेवारीला सर्वोच्च न्यायालयात एक महत्वपूर्ण सुनावणी होणार आहे.

सुनावणीनंतर राज्य निवडणूक आयोग निवडणुका जाहीर करण्याची शक्यता आहे. पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका जाहीर झाल्याने कोरोना नियमावलीचे पालन करत निवडणुका होण्याची शक्यता निर्माण झाली असल्याने या सुनावणीकडे आणि नंतर निवडणूक आयोग नेमकी काय भूमिका घेतो या कडे राज्यातील प्रमुख पक्ष आणि राज्यातील जनतेचे देखील लक्ष लागून राहणार आहे,