पुढील काही दिवसातच निवडणूका जाहीर होतील; गाफील राहू नका, अजितदादांचा सल्ला

पुणे – महापालिका निवडणुका (municipal elections)सहा महिने पुढे ढकलण्यात आल्या असताना अनेक इच्छुक नाराज झाले आहेत. मात्र दुसऱ्या बाजूला पुण्याचे पालकमंत्री व उपमुख्यमंत्री अजित पवार (ajit pawar)यांनी पुढील काही दिवसातच निवडणूका जाहीर होतील, असे जाहीर केले आहे. शिवणे येथी कार्यक्रमात बोलताना पवार यांनी हा संदेश कार्यकर्ते आणि नेत्यांना दिला आहे.

निवडणूका सहा महिने पुढे गेल्या. असे काही सांगता येत नाही. प्रभाग तीन सदस्यांना ऐवजी दोनचा होईल का, सदस्य संख्या तीनचीच राहणार. पालिकेची आज मुदत संपत असल्याने निवडणुक होईपर्यंत लढणाऱ्यांना थोडा खर्च जास्त करावा लागणार आहे. पुढील काही दिवसात, महिन्यात एकदम अचानक निवडणूक जाहीर होतील. हे मी सांगतो. पुन्हा मला दोष देऊ नका. नाहीतर म्हणाल आम्हाला फसवलं राव, म्हणून मी सर्वच राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांना मी सांगतो की, तुम्ही गाफील राहू नका,” असे पवार म्हणाले.

“निवडणुकांमध्ये ओबीसींनासुद्धा प्रतिनिधित्व मिळावे असा आमचा प्रयत्न आहे. पण सर्वोच्च न्यायालयाने किंवा उच्च न्यायालयाने त्या निर्णयाला स्थगिती दिली तर निवडणुका लगेच पण लागू शकतील. पुणे शहरातील प्रभाग रचना न बदलता तशीच राहणार आहे व तीन सदस्यांचा प्रभाग राहणार आहे. यासर्वामध्ये आपण निवडणुकांच्या बाबत जागृत राहा. जनतेने चांगले लोकप्रतिनिधी निवडून देण्याचे काम केले पाहिजे. महाराष्ट्रामध्ये उत्तम प्रकारचा विकास करता येईल यासाठी आम्ही काम करत आहोत, असे अजित पवार म्हणाले.