इलॉन मस्क आणि ट्विटरमधील डील रद्द होणार ?
नवी दिल्ली – ट्विटरच्या (Twitter) खरेदी व्यवहारामुळे सध्या इलॉन मस्क (Elon Musk) सर्वत्र चर्चेत आहे. काहीजण त्यांच्या निलंबित खाती पुनर्संचयित (Restored suspended accounts) करण्यावर शंका घेत आहेत. कुणाला एडिट बटणात (Edit Button) रस आहे, तर कुणाला पराग अग्रवाल (Parag Agrawal) आणि जॅक डोर्सी (Jack Dorsey) यांना खेचण्यात रस आहे. या सगळ्या घडामोडी घडत असताना, एक बातमी आली आहे ज्यामुळे इलॉन मस्क ट्विटर डील पूर्ण करू शकतील की नाही याची चिंता गुंतवणूकदारांना सतावत आहे. हा करार पूर्ण करण्यासाठी टेस्ला प्रमुखाला तब्बल 44 अब्ज डॉलर्सची गरज आहे. भारतीय चलनात ही रक्कम ३ लाख ३६ हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. मस्क हा जगातील सर्वात श्रीमंत माणूस आहे मात्र एवढी मोठी बातमी समोर येवून देखील बुधवारी 27 एप्रिल रोजी ट्विटरचे शेअर्स पडले.
हा करार (Agreement) पूर्ण करण्यासाठी मस्ककडे पुरेसे पैसे नसल्याची चिंता व्यावसायिकांना आहे. अहवालानुसार, मस्ककडे सध्या फक्त 21 अब्ज डॉलरची रोकड आहे, तर हा करार दुप्पट रकमेपेक्षा जास्तीचा आहे. म्हणूनच मस्कने ट्विटरची कमान हाती घेतली तर त्यांना यासाठी त्यांच्या टेस्ला (Tesla) कंपनीचे शेअर्स विकावे लागतील. गुंतवणुकदारांच्या या शंका खऱ्याही ठरू शकतात कारण मस्क यांचा यु टर्न (U Turn) घेण्याचा इतिहास आहे. फार मागे जाण्याची गरज नाही. ट्विटरचे अनेक शेअर्स विकत घेतल्यानंतर अखेरच्या क्षणी कंपनीच्या संचालक मंडळात सहभागी न होण्याचा निर्णय घेतल्यानंतर मस्कचा ‘पलटूराम’ चेहरा या महिन्यात दिसला. 2018 मध्ये, एलोन मस्क यांनी ट्विट केले की टेस्लाचा संपूर्ण भाग खरेदी करण्यासाठी त्यांच्याकडे पुरेसे पैसे आहेत. मग त्याने दावा केला की हे टेस्ट शेअर्स विकत घेण्यासाठी त्याच्याकडे $72 अब्ज आहेत. मात्र हा दावा केल्यानंतर मस्क त्या प्रस्तावाला पुढे जाऊ दिले नाही.
इंटरनॅशनल न्यूज एजन्सी रॉयटर्सच्या मते, न्यूयॉर्क स्टॉक एक्स्चेंजवर (New York Stock Exchange) कंपनीचा स्टॉक 2.1% घसरून $48.68 वर बंद झाला, जो $54.20 च्या डील किमतीपेक्षा खूपच कमी आहे. ही माहिती समोर आल्यापासून हा करार पूर्ण होण्याची शक्यता फारच कमी असल्याचा अंदाज गुंतवणूकदार व्यक्त करत आहेत. हे देखील मनोरंजक आहे कारण एलोन मस्कचे कोणत्याही सोशल मीडिया कंपनीमध्ये होल्डिंग नाही. अशा स्थितीत गुंतवणूकदारांच्या सट्टा हलक्यात घेऊ नये