बीड | सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी कृष्णा आंधळे (Krishna Andhale) अद्याप फरार असून, तब्बल 68 दिवस उलटले तरीही पोलिसांना त्याचा थांगपत्ता लागलेला नाही. बीड पोलिसांसह सीआयडी पथक त्याचा शोध घेत आहेत, मात्र आंधळे अजूनही कायद्याच्या कचाट्यात सापडलेला नाही.
बीड पोलिसांनी आंधळेला (Krishna Andhale) अधिकृतरित्या फरार घोषित केले असून, त्याच्या शोधासाठी विशेष मोहीम राबवली जात आहे. पोलिसांनी त्याच्याबाबत माहिती देणाऱ्यास बक्षीस जाहीर केले असले तरी कोणतीही ठोस माहिती मिळालेली नाही.
आंधळेचा शोध घेण्यासाठी पोलीस आणि सीआयडीकडून वेगवेगळ्या राज्यांत आणि जिल्ह्यांत तपास सुरू आहे. त्याच्या शक्यता असलेल्या ठिकाणांवर छापेमारी केली जात आहे, मात्र तो पोलिसांना गुंगारा देत आहे.
या प्रकरणामुळे स्थानिकांमध्ये अस्वस्थता असून, पोलिसांच्या कार्यक्षमतेबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत. 68 दिवसांपासून आरोपी फरार असताना त्याला पकडण्यात पोलिसांना अपयश येत आहे, ही बाब चिंतेची असल्याचे स्थानिक नागरिकांचे मत आहे.
आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअॅप ग्रुप
महत्वाच्या बातम्या :
‘लव्ह जिहाद’ कायद्याला माझा विरोध | Ramdas Athawale
‘फक्त दोन तास ईडी हातात द्या, अमित शाह सुद्धा मातोश्रीत येऊन शिवसेनेत प्रवेश करतील’
सुरेश धस, धनंजय मुंडे भेटीवर अजितदादांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले,…