शिवसेनेचे 40 आमदार गेले तरी सुद्धा सरकार बनते; बच्चू कडू यांचा दावा

Mumbai – – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर राज्यात नवी सरकार उदयास आले आहे. शिंदे यांच्या गटाविरोधात सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरु आहे. नव्या सरकारला राजकीय संघार्षासोबत कायदेशीर सुद्धा संघर्ष करावा लागत आहे. हा संघर्ष सोपा करण्यासाठी शिंदे यांच्या गटापुढे कोणत्यातरी पक्षात विलीन होणं हा एक पर्याय आहे. त्यामुळे शिंदे गट भाजपात विलीन होणार की आणखी कोणत्या पक्षात जाणार? अशा विविध चर्चांना उधाण आलं आहे. याशिवाय मंत्रिमंडळ विस्तारहा देखील मोठ्या चर्चेचा विषय बनला आहे.

या दरम्यान माजी मंत्री बच्चू कडू यांनी एक मोठे वक्तव्य केलं आहे. ते म्हणाले, मंत्रिमंडळ विस्तार करायला कुणाचीही भीती नाही. मंत्रीमंडळ विस्तार हा अंतर्गत प्रश्न आहे. केंद्रात भाजप सरकार राज्यात भाजप सरकार त्यामुळे भीती बाळगण्याचे कारण नाही. शिवसेनेचे 40 आमदार गेले तरी सुद्धा भाजप आणि अपक्ष मिळून सरकार बनते, त्यामुळे दबाव नसल्याचेही यावेळी बच्चू कडू यांनी सांगितले. राज्यात अतिवृष्टी झाली आहे. या परिस्थितीत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री दोघेही दौरे करून माहिती घेत आहेत. विस्तार करण्यापेक्षा दौरे करणे महत्त्वाचे असल्याचेही ते म्हणाले.