मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असले तरीही महत्वाची मंत्रिपदे भाजपकडे जाणार

मुंबई – महाराष्ट्रात नवीन सरकार आल्यानंतर आता भाजप (BJP) आणि शिंदे (Eknath Shinde)  यांच्यात विभाग आणि पदांच्या वाटणीवर एक करार झाल्याचे दिसते. हिंदुस्तान टाईम्सच्या बातमीनुसार, शिंदे कॅम्पमध्ये खुद्द शिंदेंसह 40 नेत्यांचा समावेश असून, त्यापैकी 16 मंत्री मंत्रिपदाची शपथ घेऊ शकतात, तर सरकारमधील 27 मंत्री भाजपचे असतील. राज्यातील मुख्यमंत्र्यांसह मंत्रिमंडळात जास्तीत जास्त ४३ सदस्य असू शकतात.

शिंदे गटाच्या खात्यात ३० टक्के मंत्रीपदे

मिळालेल्या माहितीनुसार, युतीमध्ये (in alliance) एक तृतीयांश आमदार असलेल्या शिंदे गटाला ३० टक्क्यांहून अधिक मंत्रीपदे मिळवण्यात यश आले आहे. वृत्तानुसार, भाजप गृह, अर्थ, महसूल, सहकार आणि जलसंपदा ही महत्त्वाची खाती स्वत:कडे ठेवणार आहे, यावरून हे सिद्ध होते की, सरकार शिवसेनेचे शिंदे चालवत असले तरी भाजपचीच सत्ता राहणार आहे. दुसरीकडे, शिंदे कॅम्पला नगरविकास, सार्वजनिक आरोग्य, वैद्यकीय, शिक्षण, कृषी आणि ग्रामविकास विभाग मिळू शकतात. त्याचवेळी भाजपच्या एका ज्येष्ठ नेत्याने सांगितले की, शहरी लोकसंख्येशी संपर्क कायम ठेवण्यासाठी भाजपला गृहनिर्माण विभागही (Housing Department ) स्वत:कडे ठेवायचा आहे.

महाराष्ट्रात अद्याप मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही. सध्या मंत्रिमंडळात मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Deputy Chief Minister Devendra Fadnavis) यांचाच समावेश आहे. 18 जुलै रोजी होणाऱ्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीनंतर (presidential election) पुढील आठवड्यात मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता आहे. सर्व मंत्रीपदे एकाच वेळी भरली जाणार नाहीत, काही मंत्रीपदे तूर्तास रिक्त ठेवण्यात येतील, असे भाजप नेत्याने सांगितले. त्याचवेळी शिवसेनेच्या एका ज्येष्ठ नेत्याने सांगितले की, शिंदे गटातील नेते कॅबिनेट पदांवर नाराजी दर्शवू शकतात, सर्वांना कॅबिनेट मंत्री व्हायचे आहे. ते म्हणाले की, ठाकरे सरकारमध्ये राज्यमंत्री असलेले बच्चू कडू (Bachhu Kadu) हे कृषीमंत्री (Minister of Agriculture) होण्यासाठी उत्सुक आहेत. अशा स्थितीत शिंदे गटात जोरदार खडाजंगी होऊ शकते.