कोरोनासारख्या महाभयंकर परिस्थितीतसुद्धा सरकारने जनतेचे हित जपत सर्वांची काळजी घेतली – येवले

पुणे – भाजपला राज्यात सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी शिवसेना, राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसने एकत्र येत सरकार स्थापन केले आहे. या घटनेला आता दोन वर्षे पूर्ण होत असून सरकारच्या कामगिरीबाबत महाविकास आघाडीतील नेते समाधान व्यक्त करत आहेत तर विरोधीपाक्षातील नेत्यांनी ठाकरे सरकारची पोलखोल सुरु केली आहे.

वाढती बेरोजगारी, भ्रष्टाचार, महिला सुरक्षा आदी मुद्द्यांवर म्हणावी तेवढी चांगली कामगिरी सरकारला करता आली नसल्याची टीका विरोधक करत आहेत. तर कोरोना काळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात केलेल्या कामगिरीचा दाखला देत महाविकास आघाडीतील नेते स्वतःच्या सरकारचा बचाव करताना दिसून येत आहेत.

दरम्यान, युवासेना सहसचिव शर्मिला येवले यांनी सरकारच्या कामगिरीबाबत आपलं व्यक्त केले आहे.त्या म्हणाल्या, दोन वर्षात अनेक कठीण काळात सरकारने अनेक संकटांना तोंड दिलं निसर्ग चक्रीवादळ , कोरोना, महापूर नैसर्गिक संकटातून सरकारने राज्याला बाहेर काढत नागरिकांना दिलासा दिला महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात आपल स्थान तयार केलं आहे . सरकार दुसरं कोणी नसून सरकार तुम्ही आहात, तुमच्या सगळ्यांच आहे, तुमच्यासाठी आहे हे या दोन वर्षात महाविकास आघाडीने दाखवून दिलं.

कोरोना सारखी महाभयंकर परिस्थिती असेल निसर्गाचा प्रकोप असतील यात सुद्धा सरकारने जनतेचे हित जपत सर्वांची काळजी घेतली आहे. त्यामुळे सरकारची एक वेगळी प्रतिमा सर्वसामान्यांच्या मनात रुजली आहे गावोगावी खेडोपाडी सरकारने केलेल्या कामाबद्दल आपलेपणा जपला आहे. अनेक विकासाची कामे सरकारने हाती घेतलीत कर्जमाफी पासून ते नैसर्गिक संकटात सापडलेल्या कोकणा पर्यंत ही मदत पोहोचली आहे. अवकळी पावसात सापडलेल्या शेतकऱ्यांना मदत ही पोहचवयला सरकार पुढे आल. राज्यात महिला सुरक्षित राहाव्यात यासाठी सर्वतोपरी मदत सरकार करत आहे.

https://youtu.be/FkhUTw1OjTM

You May Also Like